advertisement

मेहंदी ऐवजी रक्ताने माखले हात, लग्नाच्या आदल्या रात्री अतिकने मित्राला ठेचलं, बीडला हादरवणारी घटना

Last Updated:

Crime in Beed: बीड जिल्ह्याच्या रायमोहा तालुक्यात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्याच्या रायमोहा तालुक्यात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं दगडाने ठेचून मित्राचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाने ही हत्या केली, त्याचं दुसऱ्याच दिवशी लग्न होतं. लग्नाच्या आदल्या रात्रीच मेहंदी ऐवजी त्याचे हात रक्ताने माखले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

बीडच्या रायमोहा परिसरातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात ३० वर्षीय चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता, ही हत्या मयत चांदचा मित्र अतिक तांबोळी याने केल्याची माहिती समोर आली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चांद ऊर्फ गुड्डू याने आरोपी अतिकला दीड लाख रुपये उसणे दिले होते. हे पैसे परत मिळावे, यासाठी चांदने अतिककडे पैशांची मागणी लावून धरली होती. तो सतत या पैशांचा तगादा लावत होता. पण अतिक पैसे देत नव्हता. सोमवारी आरोपी अतिक याचं लग्न होणार होतं. "जर तू माझे पैसे दिले नाहीत, तर मी तुझ्या लग्नात येऊन मोठा गोंधळ घालेन," अशी धमकी चांदने अतिकला दिली होती.
advertisement

लग्नाच्या आदल्या रात्रीच काढला काटा

आपली लग्नात बदनामी होईल आणि गोंधळ उडेल या भीतीने अतिक प्रचंड धास्तावला होता. याच रागातून त्याने रविवारी रात्री चांदला डोंगरदेवी दगडवाडी शिवारात गाठले. तिथे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी संतापलेल्या अतिकने दगडाने ठेचून चांदची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर अतिक फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मध्यरात्री बीड शहरातून त्याला अटक केली.
advertisement
लग्नाला अवघे काही तास बाकी असताना अशाप्रकारे नवरदेवाला अटक झाल्याने पाहुण्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी अतिकला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मेहंदी ऐवजी रक्ताने माखले हात, लग्नाच्या आदल्या रात्री अतिकने मित्राला ठेचलं, बीडला हादरवणारी घटना
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement