पुणे : हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपूर वात लावली जाते. तसेच घरोघरी, अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. देशभरात देखील वेगवेगळ्या मंदिरात विविध दिवे लावले जातात. आता तुम्ही म्हणाल की ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय तर तिमिराकडून तेजाकडे जाणारी प्रकाशाची वाट दाखविणारा दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. पुण्यात चतुर्श्रुंगी मंदिराच्या भव्य प्रांगणात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
हजारो दिव्यांनी उजळला चतुर्श्रुंगी मंदिर परिसर
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्यावतीने आणि देवस्थान समितीच्या सहाय्याने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य उत्सव साजरा करण्यात आला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रचनात्मक पद्धतीने लावण्यात आलेल्या हजारो दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाले. या सोबतच दीपोत्सव पाहण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये नवचैतन्याची उमेद आणि ऊर्जेचे स्त्रोत तयार झाल्याचे दिसून आले.
या जन्मतारखेचे लोक असतात प्रचंड भाग्यवान! सौंदर्य, धनसंपत्ती असते भरपूर, राजासारखं जगतात
यंदाच हे 11 व वर्ष असून हास्ययोग परिवाराच्या माध्यमातून अनेक महिलांनी सहभाग घेत दिवे लावत दीपोत्सव साजरा केला. या संस्थेमध्ये जवळपास 25000 लोक जोडले गेले आहेत. आणि यामाध्यमातून अनेकांना हसवण्याचं काम देखील केलं जात, अशी माहिती समनव्यक मकरंद टिल्लू यांनी दिली आहे.
दिव्यांनमुळे मंदिर परिसर हा तेजोमय झालेला पाहिला मिळाला. त्यामुळे एक सकारात्मक वातावरण हे पाहिला मिळाल. गेली अनेक वर्ष झालं हा उपक्रम राबवला जात आहे.





