देवघर : सनातन धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. ज्या घरात हिरवीगार तुळशी असते, त्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो, असे मानले जाते. तसेच तुळशीच्या पानांविना देवाजी पूजा अपूर्ण मानली जाते. मात्र, असे असताना काही वेळा तुळशीचे झाड हे हानिकारकही सिद्ध होऊ शकते. घरात तुळशीची पाने लावली तर दिशेबाबत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
advertisement
देवघर येथील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या घरात तुळशीचे झाड असते, ते घर शुद्ध मानले जाते. त्याठिकाणी देवी देवतांचा वास असतो. घरात तुळशीचे झाड राहायला हवे.
हरतालिकेच्या पूजेमध्ये या गोष्टींचा समावेश करायला विसरू नका, अन्यथा मिळणार नाही उपवासाचं फळ
तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु प्रसन्न होतात. यामुळे घराच्या सुख-समृद्धीत वाढ होते. मात्र, घरात अशा काही जागा आहेत, ज्याठिकाणी तुळशीचे झाड अजिबात लावू नये. जर तुम्ही तिथे तुळशीचे झाड लावले लक्ष्मी माता नाराज होते आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, असेही त्यांनी सांगितले.
थंड की गरम, सकाळी उपाशी पोटी नेमकं कोणतं पाणी प्यावं, योग्य पद्धत तब्बल 56 आजारांना ठेवते दूर
घरात या जागी अजिबात तुळशीचे झाड लावू नये -
- ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला तुळशीचे झाड लावू नये.
- घरातील नैऋत्य दिशेलाही तुळशीचे झाड लावू नये. नैऋत्य दिशेला दक्षिण पश्चिम दिशाही म्हटले जाते. ही जागा अशुभ असल्याने याचा घरावर नकारात्मक प्रभाव पडतो.
- घराच्या तळघरात किंवा अंधार असलेल्या ठिकाणी तसेच जिथे ऊन नसेल तिथेही तुळशी लावू नये. यामुळे तुळशी माता नाराज होते. तुळशी वाळल्यावर त्याचा कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो.
- गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोरही अजिबात तुळशीचे झाड लावू नये. यामुळेही तुमच्या घरावर आणि तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
सूचना - ही माहिती ज्योतिष, आचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
