ज्योतिषी अखिलेश पांडे यांनी सांगितलं की, बुधवारी हे 7 साधे आणि सोपे उपाय केल्याने तुमचं नशीब चमकू शकतं. गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या आयुष्यातले त्रास तर कमी होतातच, पण आपली आर्थिक परिस्थिती पण सुधारते. पण हे लक्षात ठेवा की कोणताही उपाय तेव्हाच काम करतो, जेव्हा तो पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि रोजच्या रोज केला जातो. चला तर मग जाणून घेऊया बुधवारचे असे 7 खास उपाय, जे जर आपण भक्तिभावनेने केले तर आपलं नशीब नक्कीच उजळेल.
advertisement
गणपतीची पूजा : बुधवारी सकाळी आंघोळ झाल्यावर गणपती बाप्पाची व्यवस्थित पूजा करा. त्यांना दुर्वा, लाडू आणि शेंदूर अर्पण करा. 'ओम गण गणपतये नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करा. असं केल्याने बुध ग्रहाचे दोष शांत होतात आणि आयुष्यातले अडथळे दूर होतात.
उसाच्या रसाने अभिषेक : गणपती बाप्पांना उसाचा रस खूप आवडतो. बुधवारी गणपतीला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने खूप फायदा होतो. हा उपाय केल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक भरभराटीचा मार्ग उघडतो.
हिरवे कपडे घाला : बुधवारी हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे, कारण हा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी हिरवे कपडे घातल्याने आणि हिरव्या वस्तू दान केल्याने ग्रहांची स्थिती चांगली होते. मानसिक तणाव कमी होतो.
कृष्णाला बासरी अर्पण करा : जर घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला मानसिक शांती हवी असेल, तर बुधवारी भगवान कृष्णाला बासरी अर्पण करा. त्यानंतर ही बासरी घराच्या उत्तर दिशेला असलेल्या खोलीत ठेवा. या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
गायीला हिरवा चारा खाऊ घाला : गायीला हिरवा चारा खाऊ घालणे हे पुण्यकर्म मानले जाते. बुधवारी हा उपाय केल्याने केवळ पाप नष्ट होतात, तर देवी लक्ष्मी घरात वास करते.
गरजू व्यक्तीला हिरवे मूग दान करा : बुधवारी गरजवंत व्यक्तीला हिरवे मूग दान करा. हा उपाय विशेषतः बुध ग्रहाचे वाईट परिणाम कमी करतो आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवतो.
लहान मुलांना मिठाई वाटा : बुधवारी गरीब किंवा गरजू मुलांना मिठाई वाटा. यामुळे तुम्हाला पुण्य तर मिळतेच, पण तुमच्या इच्छाही लवकर पूर्ण होतात.
हे ही वाचा : धन-संपत्ती-पैसा हवाय? तर घरात 'या' दिशेला ठेवा चांदीचा ग्लास, देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद
हे ही वाचा : सावधान! घरात रात्रीच्या वेळी करू नका 'ही' चूक, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम