TRENDING:

का साजरी केली जाते महाशिवरात्री? या दिवशी कोणते उपाय केल्याने चमकत नशीब? जाणून घ्या A टू Z माहिती

Last Updated:

दरवर्षी आपण न चुकता महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करतो. या दिवशी अनेक लोक उपवास देखील ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का महाशिवरात्री का साजरी केली जाते? नेमकं काय कारण आहे या मागे आणि काय फायदा होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Why We Celebrate Mahashivratri : दरवर्षी आपण न चुकता महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करतो. या दिवशी अनेक लोक उपवास देखील ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का महाशिवरात्री का साजरी केली जाते? नेमकं काय कारण आहे या मागे आणि काय फायदा होतो. अनेकांना महाशिवरात्री का साजरी केली जाते यामागचं ठोस कारण माहिती नाही. आजच्या आपल्या या लेखातून आपण महाशिवरात्री का साजरी करतो हे जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

का साजरी केली जाते महाशिवरात्री?

महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जाणारा भगवान शिवाचा प्रमुख सण आहे. या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता, तसेच शिवाने तांडव नृत्य केले होते, असे मानले जाते. हा दिवस अंधार व अज्ञानावर मात करण्याचे, अध्यात्मिक जागृतीचे आणि शिवाची पूजा व उपवास करून आत्मशुद्धी करण्याचे स्मरण आहे. या दिवशी मनोभावे भगवान शंकरांची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी लाभते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

advertisement

2026 मध्ये कधी आहे महाशिवरात्री?

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. यावर्षी रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील संकटे दूर होऊन नशीब उजळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

कोणते उपाय केल्याने मिळते शुभ फळ

advertisement

यंदा महाशिवरात्रीला 'सर्वार्थ सिद्धी योग' जुळून येत असल्याने खालील उपाय अधिक प्रभावशाली ठरतील.

रुद्राभिषेक: आर्थिक चणचण दूर करण्यासाठी शिवलिंगावर उसाच्या रसाने किंवा दह्याने अभिषेक करा. यामुळे धनसंपत्तीत वाढ होते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात.

बेलपत्राचा उपाय: महादेवाला 'बेलपत्र' अत्यंत प्रिय आहे. 108 बेलपत्रांवर चंदनाने 'ॐ नमः शिवाय' लिहून ती शिवलिंगावर अर्पण केल्याने अडकलेले नशीब चमकते.

advertisement

काळे तीळ आणि जल: जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, तर जलाभिषेक करताना पाण्यात थोडे काळे तीळ मिसळा. यामुळे शनीचे दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

निशिता काळ पूजा: 15 फेब्रुवारीच्या रात्री 12:02 ते 12:56 या दरम्यान भगवान शंकराची पूजा केल्यास अशक्य गोष्टी देखील शक्य होतात, असे मानले जाते.

advertisement

दानधर्म: या दिवशी गरिबांना अन्नदान किंवा पांढऱ्या वस्तू दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डिलिव्हरी बॉय झाला मालक! सायलीची साथ अन् राहुल झाला बॉस, महिन्याला इतकी कमाई
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
का साजरी केली जाते महाशिवरात्री? या दिवशी कोणते उपाय केल्याने चमकत नशीब? जाणून घ्या A टू Z माहिती
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल