दसरा 2024 कधी आहे -
द्रीक पंचांग नुसार या वर्षी दसऱ्याची अश्विन शुक्ल दशमी तिथी निश्चितपणे 12 ऑक्टोबर, शनिवारी सकाळी 10.58 पासून सुरू होईल. दशमी तिथी रविवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.08 पर्यंत वैध असेल. दशमी तिथीच्या रावण दहनाच्या शुभ मुहूर्तावर पाहिल्यास, या वर्षी दसरा हा सण शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे.
advertisement
दसरा 2024 2 शुभ मुहूर्तावर साजरा केला जाईल -
12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. दसऱ्याला रवियोग संपूर्ण दिवस चालेल, तर सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 06.20 पासून सुरू होऊन रात्री 09.08 पर्यंत चालेल. रवि योगात सर्व प्रकारचे दोष दूर होतील आणि सर्वार्थ सिद्धी योगात केलेल्या कार्यात यश मिळण्याची अधिक शक्यता असते.
दसरा 2024 शस्त्रपूजेसाठी शुभ मुहूर्त -
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी दसऱ्याला विजय मुहूर्तावर शस्त्रांची पूजा केली जाते. या वेळी दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त 2:03 ते 2:49 पर्यंत आहे.
दसरा 2024 रावण दहन मुहूर्त -
यावेळी दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी 05.54 नंतर अडीच तास असेल. रावण दहनाचा शुभ काळ सूर्यास्तापासून अडीच तासांचा असतो, रावणदहन हे प्रदोष काळातच केले जाते. सूर्यास्तानंतर अंधार पडल्यावर रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाईल.
दसऱ्याचे महत्त्व -
पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी अश्विन शुक्ल दशमीला लंकेतील अधर्मी राजा रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या तावडीतून सोडवले होते. अशा रीतीने सत्याचा असत्यावर आणि धार्मिकतेचा अधर्मावर विजय झाला. या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी अश्विन शुक्ल दशमीला दसरा हा सण साजरा करतात आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. दरवर्षी नवरात्रीच्या सुरुवातीपासून रामलीलाचे आयोजन केले जाते आणि त्याची समाप्ती रावण वध म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाने होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर देशभरात जत्रेचेही आयोजन केले जाते.
गाडी, बंगला, पैसा..! हाताच्या रेषांमध्ये अशी चिन्ह असणं भाग्यशाली; नशिबाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
