palmistry: गाडी, बंगला, पैसा..! हाताच्या रेषांमध्ये अशी चिन्ह असणं भाग्यशाली; नशिबाची मिळते साथ

Last Updated:

13 Signs Of Palm : हस्तरेषा पाहून कोणाचेही भविष्य आणि बऱ्याच गोष्टी जाणता येऊ शकतात, याविषयी आपण ऐकलं असेल. हातावरील निरनिराळ्या रेषा, तयार होणाऱ्या खुणांचा विशिष्ट अर्थ निघतो. ज्योतिषी पंडित योगेश चौरे या विषयावर अधिक माहिती देत आहेत. हस्तरेषा अतिशय काळजीपूर्वक पाहिल्यास त्यात अनेक गोष्टी दिसतात, या रेषांच्या मध्ये काही चिन्हे-खुणा असतात. व्यक्तीची स्वप्ने कार, बंगला, पैसा, संपत्ती, आरोग्य इत्यादी सर्व प्रकारची माहिती त्यातून मिळते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

News18
News18
1. गज:- हातावरील रेषांमध्ये गज म्हणजेच हत्तीचे चिन्ह दिसले तर तुम्ही भाग्यवान आहात. अशी व्यक्ती राजेशाही जीवन जगू लागते आणि तिच्याकडे पैशाची कमतरता नसते.
2. मत्स्य:- जर तुमच्या हातावरच्या रेषांमध्ये मत्स्य म्हणजेच माशासारखे चिन्ह असेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता आणि तुमची परदेश यात्राही जवळपास निश्चित आहे.
3. पालकी:- हस्तरेषांच्या मध्ये पालखीसारखे चिन्ह दिसले तर तुम्ही आनंदी व्यक्ती आहात. तुमच्याकडे नोकर, गाडी, बंगला किंवा इतर कशाचीही कमतरता राहणार नाही.
4. सिंह :- हस्त रेषांमध्ये सिंहाचा आकार असेल तर तुम्ही योद्धा आहात. तुमच्या कारकिर्दीत तुमच्याकडे प्रशासकीय अधिकारी पद मिळू शकते आणि तुम्ही कधीही हार न मानणाऱ्यांपैकी एक आहात.
advertisement
5. घोडा:- हस्तरेषांमध्ये घोड्याचा आकार तयार होणे, शुभ मानले जाते. या लोकांना सैन्यात विशेष किंवा सन्माननीय स्थान मिळू शकते.
6. त्रिशूळ:- तळहातावर त्रिशूळाचे चिन्ह असेल तर ती व्यक्ती विद्वान, ज्योतिषी किंवा अध्यात्मवादी असू शकते.
7. सूर्य :- तळहातावर सूर्यासारखे चिन्ह दिसत असेल तर व्यक्ती तेजस्वी, शूर आणि शक्तिशाली असते.
advertisement
8. कलश:- हाताच्या रेषांमध्ये कलशासारखे चिन्ह दिसल्यास त्या व्यक्तीचा धार्मिक कल आहे किंवा तो मंदिर, धर्मशाळा इत्यादींसाठी कार्य करणार आहे.
9. तलवार:- हातावरील रेषांमध्ये तलवारीसारखे चिन्ह असेल तर ते भाग्यवान किंवा सन्माननीय असल्याचे लक्षण आहे.
10. कमंडल:- तळहातावर कमंडलची खूण दर्शवते की तुम्ही दूरच्या देशांमध्ये प्रवास करू शकता किंवा कथाकार असाल.
advertisement
11. धनुष्य:- हातांच्या रेषांमधील हे चिन्ह देखील महत्त्वाचे आहे. अशी व्यक्ती धैर्यवान मानली जाते आणि कधीही हार मानत नाही.
12. बेट (द्वीप) :- तळहातावरील रेषांमध्ये कुठेही बेट दिसत असेल तर ते शुभ मानले जात नाही. नुकसान होण्याची शक्यता असते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
palmistry: गाडी, बंगला, पैसा..! हाताच्या रेषांमध्ये अशी चिन्ह असणं भाग्यशाली; नशिबाची मिळते साथ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement