TRENDING:

लग्न जुळत नाहीये म्हणून चिंता नको, हा एक सोपा उपाय अन् घरात वाजेल शहनाई!

Last Updated:

marriage tips - यासाठी तुम्हाला फार मोठी लांब पूजा करण्याची काही गरज नाही. एक लहानसा उपाय करुनही तुम्ही या समस्येवर मार्ग शोधू शकतात. हाच उपाय आपण आज जाणून घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिखा श्रेया, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

रांची - सध्या लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. मात्र, अनेकांना लग्न जुळवताना अडचणी येतात. लग्न जुळत नसल्याने काही जण तणावातही दिसून येतात. अशावेळी नेमके काय करावे, हे अनेकांना कळत नाही. मात्र, तुम्ही यावर उपाय नक्कीच शोधू शकतात. यासाठी तुम्हाला फार मोठी लांब पूजा करण्याची काही गरज नाही. एक लहानसा उपाय करुनही तुम्ही या समस्येवर मार्ग शोधू शकतात. हाच उपाय आपण आज जाणून घेणार आहोत.

advertisement

झारखंडची राजधानी रांची येथील प्रसिद्ध ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रांची विद्यापीठातून ज्योतिष शास्त्रात सुवर्णपदक मिळवले आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, तुम्ही असे अनेकदा पाहिले असेल की काही लोकांचे लग्न होत नाही. त्यांना अडचणी येतात. अशावेली तुम्हाला अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

advertisement

अंघोळीच्या वेळी पाण्यात टाका एक चुटकी हळद -

त्यांनी सांगितले की, तुम्ही सकाळी अंघोळ करताना जे पाणी घेतात, त्या पाण्यात फक्त एक चिमुटभर हळदी टाकावी आणि त्या हळदीच्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. जर तुम्ही हे जास्त दिवस केले तर तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील आणि लवकरच तुमच्या घरातही शहनाई वाजू लागेल.

advertisement

winter health tips : हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी, तुमच्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स

यामागे काय तर्क -

हळद टाकण्यामागे तर्क असा आहे की, हळद ही गुरू ग्रहाची आवडती आहे. त्यांना पिवळ्या रंगाच्या गोष्टी खूप आवडतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही हळदीने आंघोळ कराल तेव्हा तुमचा गुरू ग्रह बलवान होईल आणि जेव्हा तुमचा गुरू ग्रह बलवान असतो, तेव्हा लग्न, विवाह आणि प्रेम या सर्व गोष्टी ठीक करण्याचे काम करतो. जर तो कमकुवत असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचे लग्न शक्य होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

advertisement

गुरु ग्रह मजबूत करणे आवश्यक -

ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे हे पुढे म्हणाले की, गुरू ग्रहाला मजबूत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जास्त नव्हे तर फक्त तुम्हाला एक चिमूटभर हळद घ्यायची आहे. पाणी पूर्णपणे पिवळे करू नका आणि याच पाण्याने अंघोळ करावा. तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील. विशेष म्हणजे गुरू ग्रह कमकुवत असेल तर व्यक्तीला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते, असेही ते म्हणाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्न जुळत नाहीये म्हणून चिंता नको, हा एक सोपा उपाय अन् घरात वाजेल शहनाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल