ज्योतिषाचार्यांनी दिली माहिती
लोकल 18 सोबत बोलताना, उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे असलेल्या ग्रहस्थानम्चे ज्योतिषाचार्य अखिलेश पांडे यांनी सांगितलं की शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी आणि उपवासासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि सौभाग्य टिकून राहतं. याने केवळ आध्यात्मिक शांतीच मिळत नाही, तर मानसिक संतुलन आणि आत्मविश्वासही वाढतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनात समृद्धी, यश आणि समाधान मिळतं. म्हणून, शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा.
advertisement
शुक्रवारी करा हे उपाय
शुक्रवारच्या दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून आणि स्नान करून करा. त्यानंतर स्वच्छ पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कपडे घाला. हे रंग देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. घरातील मंदिर स्वच्छ करा आणि तिथे दिवा लावा आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करताना तिला खीर, पांढरी मिठाई, फळे आणि पांढरी किंवा गुलाबी फुलं अर्पण करा. यानंतर 'श्री सूक्त' किंवा 'लक्ष्मी चालीसा'चं पठण करा. जे लोक शुक्रवारी उपवास करतात ते दिवसभर देवी लक्ष्मीचं ध्यान करत फळे किंवा सात्विक भोजन एकदा घेऊ शकतात. उपवासाच्या काळात तामसिक भोजन, कांदा-लसूण आणि धान्य टाळावेत. शुद्धता आणि भक्तीने केलेला हा उपवास देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद घेऊन येतो.
पुढे ज्योतिषाचार्यांनी सांगितलं की, या दिवशी गरजू महिलांना दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते. तुम्ही त्यांना कपडे, मिठाई किंवा बांगड्या, बिंदी, सिंदूर, कंगवा इत्यादी सौभाग्य वस्तू भेट देऊ शकता. याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.
स्वच्छता देखील महत्त्वाची
शुक्रवारी घर स्वच्छ करण्यालाही विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असतं, तिथे देवी लक्ष्मी वास करते. म्हणून, या दिवशी विशेषतः घराचा मुख्य दरवाजा आणि पूजेची जागा व्यवस्थित स्वच्छ करा आणि तिथे गुलाल किंवा हळदीने शुभ चिन्हं काढा.
हे ही वाचा : मे महिन्यात उरका लग्न! कारण 'या' तारखांनंतर नाहीत शुभ मुहूर्त, कारण काय?
हे ही वाचा : फक्त जिवंतच नाही, तर मेलेल्या सापचे दातही असतात घातक! विषारी अन् बिनविषारी साप कसा ओळखायचा?