कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही पूजेने व्हावी आणि उसाचे भरघोस उत्पन्न मिळावे म्हणून देवी देवतांचे पूजन यावेळी केले जाते. ऊस लागवडी वेळी शेतामध्ये मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करून पूजा करण्याची परंपरा मराठवाड्यामध्ये आहे. ही पूजा का केली जाते? यामागे लोकांच्या काय धारणा आहेत हे लोकल 18 ने जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
जालना जिल्ह्यातील टाकरवन येथील गोविंद भुतेकर यांच्या दोन एकर शेतामध्ये उसाची लागवड सुरू आहे. ऊस लागवडीला सुरुवात करण्याआधी त्यांनी गणपतीची पूजा केली. ही पूजा करत असताना आपल्या सहचारिणीला सोबत घेतलं जातं. उसाचे पाच वाढे जमिनीत रोवले जातात. जमिनीतीलच मातीपासून गणपतीची मूर्ती तयार केली जाते. या वाड्यांच्या खोपीमध्ये गणपती ठेवून गणपतीपुढे नारळ आणि तांब्याचा घट ठेवला जातो. या घटाची आणि गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीला उसाचं चांगलं उत्पन्न यावं यासाठी साकडं घातलं जातं.
आंबिया बहारासाठी करा झाडे तयार, हिवाळ्यात असं करा संत्रा बागेचं पुनर्नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला
मागील कित्येक वर्षांपासून ही परंपरा आम्ही पाळत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आम्ही जोडीने गणपतीची पूजा केली आणि भरपूर उत्पन्नाची मागणी गणपतीकडे केली. गणरायाच्या आशीर्वादाने उसाचे बंपर उत्पन्न होईल, अशी अपेक्षा असल्याचे शेतकरी गोविंद भुतेकर यांनी सांगितले.





