advertisement

हिंदू नवं वर्ष ठरेल लकी! गुढी उतारवल्यानंतर 'हे' एक काम कराच, सर्व संकटं होतील झटक्यात दूर

Last Updated:

हिंदू नववर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून आणि तिची पूजा करून केली. मात्र, वास्तूशास्त्र आणि परंपरेनुसार, गुढी जेवढ्या उत्साहाने उभारली जाते, तेवढ्याच सन्मानाने आणि योग्य विधीने ती उतरवणे देखील महत्त्वाचे असते.

News18
News18
Gudi Padwa 2026 : संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदू नववर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून आणि तिची पूजा करून केली. मात्र, वास्तूशास्त्र आणि परंपरेनुसार, गुढी जेवढ्या उत्साहाने उभारली जाते, तेवढ्याच सन्मानाने आणि योग्य विधीने ती उतरवणे देखील महत्त्वाचे असते. गुढी उतरवल्यानंतर त्यातील साहित्याचा योग्य वापर केल्यास तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन वर्षभर भरभराट होते.
गुढी उतरवण्याचा योग्य मुहूर्त आणि विधी
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी सूर्यास्तापूर्वी उतरवणे शास्त्रोक्त मानले जाते. आज संध्याकाळी 05:18 ते 06:49 या वेळात गुढी उतरवणे अत्यंत शुभ राहील. गुढी उतरवण्यापूर्वी तिला हळद-कुंकू आणि अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करावा. गुळाचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर, गुढीला सन्मानाने खाली घ्यावे. असे मानले जाते की, या विधीमुळे घरातील सुख-शांती अखंड टिकून राहते.
advertisement
गुढीच्या वस्त्राचा 'असा' करा वापर
गुढीला आपण नवीन रेशमी वस्त्र किंवा साडी वापरतो. गुढी उतरवल्यानंतर हे वस्त्र फेकून देऊ नये. हे वस्त्र धुवून पवित्र ठिकाणी ठेवावे. अनेक ठिकाणी हे वस्त्र घरातील स्त्रिया किंवा मुले शुभ प्रसंगी वापरतात. वास्तूशास्त्रानुसार, हे वस्त्र आशीर्वादित मानले जाते. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल, तर या वस्त्राचा एक छोटा तुकडा लाल कपड्यात गुंडाळून, त्यात तांदूळ आणि हळकुंड ठेवून तिजोरीत ठेवल्यास पैशांची आवक वाढते आणि आर्थिक संकटं दूर होतात.
advertisement
कडुलिंबाचा पाला: तिजोरी आणि धनधान्यासाठी
गुढीला बांधलेला कडुलिंबाचा पाला हा अत्यंत औषधी आणि आध्यात्मिकदृष्ट्या 'जंतुघ्न' मानला जातो. गुढी उतरवल्यानंतर कडुलिंबाची पाने वाळवून ती तिजोरीमध्ये ठेवावीत. यामुळे धनाचे रक्षण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. तसेच, ही पाने धनधान्याच्या डब्यात ठेवल्यास धान्याला कीड लागत नाही आणि घरात अन्नाची कमतरता भासत नाही. कडुलिंबाच्या काही फांद्या देवघराजवळ किंवा मुख्य दरवाजाच्या वर लावल्यास घरातील सदस्यांचे वाईट नजरेपासून रक्षण होते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
हिंदू नवं वर्ष ठरेल लकी! गुढी उतारवल्यानंतर 'हे' एक काम कराच, सर्व संकटं होतील झटक्यात दूर
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement