advertisement

पहिल्याच दिवशी कॅप्टनचा माज उतरवला, खरातची कसून चौकशी करणाऱ्या IPS तेजस्वी सातपुते कोण आहेत?

Last Updated:

Nashik Captain Ashok Kharat: अशोक खरात याच्या संदर्भाने सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

आयपीएस तेजस्वी सातपुते-अशोक खरात
आयपीएस तेजस्वी सातपुते-अशोक खरात
मुंबई : नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची नाशिक गुन्हे शाखेने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. या पथकाचे नेतृत्व तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांनी गुरूवारी अशोक खरात याची दोन ते तीन तास कसून चौकशी केली.
भोंदूबाबा अशोक खरात याला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली. खरातच्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने किती महिलांवर अत्याचार केले आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या निर्देशानुसारच खरात याच्या चौकशी करीता नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
advertisement

तेजस्वी सातपुते यांच्याकडून 'कॅप्टन'ची दोन तास चौकशी

एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरात याची तब्बल दोन ते तीन तास कसून चौकशी केली. त्याच्याकडे असलेल्या पॅनड्राईव्हबाबतही त्यांनी विचारपूस केल्याचे कळते.

अशोक खरातची चौकशी करणाऱ्या डॅशिंग IPS तेजस्वी सातपुते कोण आहेत?

तेजस्वी सातपुते यांची ओळख महाराष्ट्राला एक दबंग पोलीस अधिकारी आणि कार्यक्षम महिला पोलीस अधिकारी म्हणून आहे. तेजस्वी सातपुते या कठोर कार्यपद्धती आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रसिद्ध आहेत. २०१२ च्या आयपीएस बॅचच्या त्या अधिकारी आहेत. त्या मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावच्या रहिवासी आहेत.
advertisement
त्यांनी आतापर्यंत सातारा पोलीस अधीक्षक, सोलापूर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच पुणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांची कारकीर्द राहिली. एसआरपीएफच्या त्या समादेशकही राहिल्या. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठीही त्यांची शासनाने नियुक्ती केली होती.

मंदिराच्या आडून महिलांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार चालविल्याचा खरात याच्यावर आरोप

advertisement
नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान अंतर्गत ईशान्येश्वर मंदिराच्या आडून महिलांच्या लैंगिक शोषणाचा प्रकार चालविल्याचा आरोप आहे. खरात याच्याकडे मोठमोठे लोक मार्गदर्शासाठी जात असत. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी नावे आहेत. अनेक क्षेत्रातील लोकांची त्याच्याकडे उठबस होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पहिल्याच दिवशी कॅप्टनचा माज उतरवला, खरातची कसून चौकशी करणाऱ्या IPS तेजस्वी सातपुते कोण आहेत?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement