नऊवारी साडी अन् मराठमोळा थाट, शिंदेंच्या शोभायात्रेत अमृता रावने का काढली मीनाताई ठाकरेंची आठवण, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ठाण्यातील गुढीपाडवा शोभायात्रेत अमृता रावने नऊवारी साडीत सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी अमृताने मीनाताई ठाकरे यांची आठवण काढली.
संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्र काढण्यात आल्या. ठाण्यातील भव्य शोभायात्रा विशेष चर्चेत राहिली. या शोभायात्रेत बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हिने मराठमोळ्या पेहरावात सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि साजशृंगारात सजलेल्या अमृताचा लूक पाहून उपस्थित ठाणेकर भारावून गेले. या शोभायात्रेत अमृतानं स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली.
ठाण्यात आयोजित या गुढीपाडवा सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शोभायात्रेत अमृता रावने उत्साहाने सहभाग घेतला. या शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर अमृता रावने न्यूज18 मराठीशी बोलताना सांगितलं, "मला पारंपरिक मराठी पेहराव खूप आवडतो. नऊवारी साडी घालण्याचा अनुभव नेहमीच खास असतो."
advertisement
यावेळी बोलताना तिने मीनाताई ठाकरे यांची आठवण काढली. मराठमोळ्या पेहरावाविषयी बोलताना ती म्हणाली, "मला मराठमोळा साज करायला आवडतो. मी ठाकरे फिल्ममध्ये मीनाताई ठाकरेंचा रोल केला होता. तेव्हा मला अशाच मराठी गेटअपमध्ये येण्यासाठी संधी मिळाली होती."
अमृता रावची ही पहिली शोभायात्रा होती. या शोभायात्रेचा अनुभव सांगताना ती म्हणाली, पहिलाच शोभायात्रेचा अनुभव आहे. "मी शोभायात्रेचा अनुभव पहिल्यांदा घेतेय. मला मी खूप आनंद घेतेय. मला खूप छान वाटत आहे. ही पदयात्रा ठाणेकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. यात एकता परंपरा आणि नववर्षाच्या स्वागाचा सुंदर मेळ आहे. लहान मुलांपासून सर्व वयोगटातील लोक सजून नटून इथे दिसतात."
advertisement
यावेळी अमृताला तिच्या आवडत्या मराठी पदार्थाबद्दल विचारण्यात आले असता तिने ‘उकडीचे मोदक’ हे तिचे आवडते असल्याचे सांगितलं. ती म्हणाली, "कोणतंही सेलिब्रेशन असो, उकडीचे मोदक मला खूप आवडतात. ते माझ्यासाठी बेस्ट आहेत."
अमृता रावच्या उपस्थितीमुळे ठाण्याच्या शोभायात्रेला आणखी रंगत आली. तिच्या मराठमोळ्या अंदाजाने आणि साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 6:56 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नऊवारी साडी अन् मराठमोळा थाट, शिंदेंच्या शोभायात्रेत अमृता रावने का काढली मीनाताई ठाकरेंची आठवण, VIDEO






