रथ सप्तमीचे धार्मिक महत्त्व - रथ सप्तमीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, याच तिथीला सूर्यदेव आपल्या दिव्य रथावर स्वार होऊन पहिल्यांदा पृथ्वीवर प्रकट झाले होते. सूर्याची पहिली किरणे याच दिवशी पृथ्वीवर पडली होती, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
रथ सप्तमी 2026 तिथी आणि वेळ - पंचांगानुसार, माघ शुक्ल सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026, शनिवारी रात्री 12:40 वाजता सुरू होईल आणि 25 जानेवारी 2026, रविवारी रात्री 11:11 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 25 जानेवारी 2026, रविवारी रथ सप्तमी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ‘या’ 4 राशी होतील करोडपती! शुक्र-शनिचा शक्तिशाली योग
सूर्य पूजनाचे फायदे - रथ सप्तमीच्या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने सूर्यदेवाची पूजा करतो, त्याच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होते. त्याला उत्तम आरोग्य, धन आणि समाजात मानसन्मान प्राप्त होतो. सूर्य उपासनेमुळे शारीरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन बुद्धी आणि तेजात वाढ होते. ज्यांच्या कुंडलीत सूर्य दोष आहे, त्यांनी या दिवशी विशेष पूजा केल्यास त्यांना शांती लाभते.
अहो साक्षात शिव-पार्वतीची जोडी! विवाह बंधनात 'या' राशी एकत्र आल्यास सुखाचा संसार
राशीनुसार सूर्य मंत्राचा जप
मेष राशी - ॐ अचिंताय नम:
वृषभ राशी - ॐ अरुणाय नम:
मिथुन राशी - ॐ आदि-भुताय नम:
कर्क राशी - ॐ वसुप्रदाय नम:
सिंह राशी - ॐ भानवे नम:
कन्या राशी - ॐ शांताय नम:
तूळ राशी - ॐ इंद्राय नम:
वृश्चिक राशी - ॐ आदित्याय नम:
धनु राशी - ॐ शर्वाय नम:
मकर राशी - ॐ सहस्त्र किरणाय नम:
कुंभ राशी - ॐ ब्रह्मणे दिवाकर नम:
मीन राशी - ॐ जयिने नम:
