गुरु प्रदोष पूजा विधी -
प्रदोषाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. पूजा स्थळ स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करून घ्यावे. एका चौरंगावर लाल कापड पसरून शिव परिवाराची मूर्ती स्थापित करावी. गुरुवार असल्यानं सोबतच भगवान विष्णूंची प्रतिमा देखील ठेवावी. धूप-दीप लावावा. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर 3 किंवा 5 बेलपत्र, फुले, चंदन, धोतरा आणि भांग शिवलिंगावर अर्पण करावी. भगवान विष्णूंना तुळस, केळी आणि मिठाई अर्पण करावी. भगवान शिवाला फळे, खीर आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा. शिव चालीसाचे पठण करावे आणि प्रदोष व्रताची कथा ऐकावी. शेवटी शंकराची आरती करून मंत्रांचा जप करावा.
advertisement
भगवान शंकराचे मंत्र -
ॐ नमः शिवाय
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि॥
ॐ साम्ब सदाशिवाय नमः
गुरुप्रदोष 2026 शुभ मुहूर्त
प्रदोष पूजा मुहूर्त - 05:35 PM ते 08:19 PM
कालावधी - 02 तास 44 मिनिटे
दिवसाची प्रदोष वेळ - 05:35 PM ते 08:19 PM
त्रयोदशी तिथी प्रारंभ - जानेवारी 01, 2026 रोजी 01:47 AM वाजता
त्रयोदशी तिथी समाप्त - जानेवारी 01, 2026 रोजी 10:22 PM वाजता
प्रदोष काळाचे महत्त्व -
कोणत्याही प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळाला खूप महत्त्व असते. त्रयोदशी तिथीमध्ये रात्रीच्या पहिल्या प्रहराला, म्हणजेच सूर्यास्तानंतरच्या संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळ म्हणतात. त्रयोदशीच्या रात्रीच्या पहिल्या प्रहरात जो व्यक्ती महादेवाच्या मूर्तीचे दर्शन घेतो, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे प्रदोष व्रताच्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात महादेवाला काही ना काही भेट किंवा नैवेद्य अवश्य अर्पण करावा.
गुरु प्रदोष आणि वर्षाचा पहिला दिवस असा शुभ संयोग आल्यामुळे आज संध्याकाळी पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत श्रेष्ठ ठरेल. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती (गुरु ग्रह) यांना प्रिय आहे. आज गुरुवारी त्रयोदशी तिथी आल्याने पिवळे वस्त्र परिधान करून शिवपूजा केल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाचे दोष दूर होतात, नशिबाची साथ मिळते आणि वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जानेवारी महिना कोणासाठी लकी?
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
