दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर घरातील तिजोरीची पूजा ही तितकीच महत्त्वाची आणि लाभदायक आहे.
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते दिवाळीच्या दिवशी घरातील तिजोरीची पूजा केल्यानंतर त्यावर एक विशेष गोष्ट टांगली पाहिजे. त्यामुळे ती व्यक्ती आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया दिवाळीत तिजोरीला कोणती गोष्ट लटकवणे शुभफळदायी ठरेल.
advertisement
दिवाळी 2023 तिजोरी पूजेचे महत्त्व -
ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळी हा सण अमावस्या तिथीला येतो. अमावस्या तिथी अत्यंत प्रभावशाली आणि लाभदायक मानली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करण्याबरोबरच घरातील तिजोरीचीही विधीनुसार पूजा करणे आवश्यक आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून तिजोरी उघडून आरती करावी. नंतर तांदूळ तिजोरीत ठेवा. त्यानंतर तिजोरीच्या दारावर थोडं कुंकू शिंपडा आणि स्वस्तिक बनवा. असे केल्याने तिजोरी किंवा घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
दारात रांगोळीशिवाय सण कसला? रांगोळी काढण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली
तिजोरीवर काय टांगायचे?
तिजोरी पूजनानंतर दिवाळीच्या दिवशी आणखी एक खास गोष्ट करावी. कारण यानंतरच तिजोरी पूजा पूर्ण होते. पूजा केल्यानंतर तिजोरीच्या हँडलवर धागा बांधावा. या धाग्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा. लाल रंग हा लक्ष्मीचा प्रिय मानला जातो. म्हणून लाल धागा बांधणं अधिक शुभ ठरेल. यामुळे पैशांसंबंधी दुष्कृत्य दूर होतात. तिजोरीला कोणाची दृष्टही लागणार नाही. जर तुमच्या तिजोरीला हँडल नसेल तर तुम्ही धागा तिजोरीत ठेवू शकता. दिवाळीच्या दिवशी हा उपाय करून पाहू शकता. देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय या उपायाचे फायदेही तुम्हाला मिळू शकतात.
या राशींच्या लोकांना दिवाळी भाग्य उजळवणारी! शनिकृपेनं नोकरी-व्यवसायात लाभाचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
