भिण्ड : आजही अनेक लोक धार्मिक परंपरेवर विश्वास ठेवतात. तसेच विविध प्रथांचे अनुसरण करतात. यातच एक परंपरा म्हणजे घर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची टांगणे. काही लोक आपल्या वाहनांमध्ये लिंबू आणि मिरची टांगतात. तुम्ही अनेक घरांच्या आणि दुकानांच्या बाहेर लिंबू आणि मिरची लटकलेली पाहिली असेल. मात्र, तुम्हाला माहिती आहे असे का केले जाते? ही अंधश्रद्धा आहे की एक युक्ती आहे की, त्याच्याशी काही वैज्ञानिक तथ्ये संबंधित आहेत? हे आपण जाणून घेऊयात.
advertisement
तुम्ही अनेक लोकांच्या घराच्या आणि दुकानांच्या बाहेर लिंबू आणि मिरची लटकवताना पाहिले असेल. असे मानले जाते की ते टांगणे किंवा स्थापित केल्याने व्यवसायावर कुणाची वाईट नजर पडत नाही म्हणजे व्यवसायाला दृष्ट लागत नाही. पण या उपायाला किंवा युक्तीला ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्वदेखील जोडलेले आहे. म्हणून त्यामुळे आजही घर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लटकवण्याची परंपरा सुरू आहे.
ज्योतिष आचार्य राजेश शास्त्री यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, घराबाहेर लिंबू आणि मिरची टांगण्यामागे हे कारण आहे की, देवी लक्ष्मीची बहीण दरिद्रता हिला आंबट आणि मसालेदार पदार्थ आवडतात. अशा स्थितीत दुकानाच्या बाहेर मिरची आणि लिंबू टांगल्याने दारिद्रता बाहेर थांबते आणि आत लक्ष्मी वास करते. म्हणून अशाप्रकारे हे लिंबू आणि मिरची टांगण्यात येते.
काय आहे प्रक्रिया -
धार्मिक श्रद्धेनुसार, लिंबू आणि मिरची लटकवल्याने लक्ष्मी देवी घरात राहते.ज्योतिषांनी सांगितले की, यासाठी एक लिंबू आणि सात मिरच्या एका धाग्यात बांधून मंगळवारी घराबाहेर लटकवा. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहील आणि नकारात्मक ऊर्जा कधीही येणार नाही. पण प्रत्येक आठवड्याला लिंबू-मिरचीचे पेंडंटला बदलावे अन्यथा त्याचे फायदे मिळणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.