TRENDING:

हिरा परवडणार नाही, मग 'हा' रत्न करा खरेदी! भाग्याचा दरवाजा उघडेल

Last Updated:

केवळ महागडेच रत्न आपल्यासाठी लाभदायी ठरतात असं नाही. अनेकदा परवडणारे रत्नही लोकांचं नशीब पालटतात. परंतु एका गोष्टीची काळजी घ्यावी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ईशा बिरोरिया, प्रतिनिधी
ग्रह आणि राशीनुसार रत्नांचा वापर आपल्या आयष्यात विविध प्रकारे लाभदायी ठरतो.
ग्रह आणि राशीनुसार रत्नांचा वापर आपल्या आयष्यात विविध प्रकारे लाभदायी ठरतो.
advertisement

ऋषिकेश, 14 नोव्हेंबर : शास्त्रांमध्ये 84 रत्नांचा उल्लेख आढळतो. त्यापैकी माणिक, मोती, हिरा, नीलम, मरकत (पन्ना/पाचू) ही पंचरत्न आणि गोमेद, पुष्कराज, वैडूर्य, पोवळे ही चार धरून झालेल्या एकूण 9 रत्नांना नवरत्न म्हणतात. या 9 रत्नांची उपरत्नही आहेत.

ग्रह आणि राशीनुसार रत्नांचा वापर आपल्या आयष्यात विविध प्रकारे लाभदायी ठरतो. शुक्राला वैभव आणि धनाचा ग्रह मानलं जातं. त्यामुळे आपल्या कुंडलीतील त्याचं स्थान मजबूत करण्यासाठी लोक हिरे परिधान करतात. परंतु प्रचंड महाग असल्याने हिरे सर्वांनाच परवडतील असं नाही. म्हणून वैभव आणि धनप्राप्तीसाठी त्याचे उपरत्न परिधान केले जातात.

advertisement

बहिणींनो, यंदा घेऊ नका, तुम्ही स्वतः 'हे' गिफ्ट द्या; भाऊ होईल खुश!

तिरुपती जेम्स पॅलेसचे मालक गोपाळ अग्रवाल हे स्वतः रत्न बनवतात आणि 35 वर्षांपासून त्यांचा व्यवसाय करतात. त्यांनी सांगितलं की, हिरा प्रचंड महाग असतो. त्यासह इतर काही प्रमुख रत्नांची किंमतही न परवडणारी असते. त्यामुळे लोक त्यांचे उपरत्न खरेदी करतात.

advertisement

नीलम रत्न परिधान केल्यानंतर होतो आर्थिक लाभ; कोणत्या राशींसाठी फायदेशीर?

ते पुढे म्हणाले, केवळ महागडेच रत्न आपल्यासाठी लाभदायी ठरतात असं नाही. अनेकदा परवडणारे रत्नही लोकांचं नशीब पालटतात. परंतु एका गोष्टीची काळजी घ्यावी. आपण मुख्य रत्न वापरला किंवा उपरत्न वापरला तरी तो खरा असावा. कारण नकली रत्नांचा ग्रह, ताऱ्यांशी काही संबंध नसतो. ज्यांना हिरे खरेदी शक्य नाही, त्यांनी ओपल, जरकन किंवा स्फटिक वापरावं, असा सल्ला अग्रवाल यांनी दिला.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
हिरा परवडणार नाही, मग 'हा' रत्न करा खरेदी! भाग्याचा दरवाजा उघडेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल