चुकूनही या दिशांना पाय करून झोपू नये; आरोग्य बिघडतं, अडचणी वाढत राहतातप्रत्येक ग्रह मानवी जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करतो. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ठराविक ग्रहांची महादशा येते. कुंडलीत एखादा ग्रह शुभ स्थितीत, शुभ स्थानात असेल तर त्या ग्रहाची महादशा शुभफलदायी ठरते. ग्रह अशुभ स्थितीत असेल तर तो ठराविक कालावधी प्रतिकूल जातो. कुंडलीत शुक्र शुभ असेल तर त्याच्या महादशेदरम्यान व्यक्तीला राजासारखं सुख मिळतं. जीवन समृद्ध बनतं. शुक्राच्या महादशेचा कालावधी 20 वर्षांचा असतो. या कालावधीत संबंधित व्यक्तीला लक्झरी लाइफ, श्रीमंती, प्रेम, सुख प्राप्ती होते.
advertisement
शुक्राच्या महादशेत शुक्र, शनी, राहू आदी सर्व ग्रहांच्या अंतर्दशा ठराविक कालावधीत येते. त्या वेळी वेगवेगळी फळे मिळतात. यात काही ग्रहांची अंतर्दशा शुभ तर काहींची अशुभफलदायी ठरते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र पीडित असेल, नीच राशीत असेल तर शुक्राची महादशा कष्टदायी जाते. जर कुंडलीत शुक्राची स्थिती नकारात्मक असेल तर या कालावधीत काही उपाय करावेत. दर शुक्रवारी उपवास करावा. लक्ष्मीमातेची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवावा. मुंग्यांना पीठ-साखर खायला द्यावी. दर शुक्रवारी शुं शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शुक्रवारी लहान मुलींना खीर खायला द्यावी. दूध, कापूर, पांढरे कपडे, पांढऱ्या रंगाची मिठाई, तांदूळ दान करावेत.
पर्समध्ये नेहमी भरपूर पैसे असावेत असे तुम्हाला वाटत असेल तर वास्तुशास्त्राचा एक नियम पाळा
शुक्र जर नीच राशीत असेल तर शुक्राच्या महादशेत संबंधित व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. जोडीदाराविषयी प्रेम वाटत नाही. जीवनात कमतरता आणि गरिबी येते. भौतिक सुख मिळत नाही. गुप्तरोग, किडनी विकार किंवा डोळ्यांचे विकार होतात.
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह शुभ मानला गेला आहे. कारण हा ग्रह सुख-समृद्धी, पैसा, प्रेम, आकर्षण आणि भौतिक सुखाचा कारक असतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र शुभ असेल, उच्च राशीत किंवा शुभ ग्रहाबरोबर युती, योगात असेल तर व्यक्तीला नशिबाची साथ मिळते. अशा व्यक्तीचं आयुष्य सुखमय असतं. शुक्राची 20 वर्षांची महादशा अशा व्यक्तींसाठी सर्वोत्तम कालावधी असतो. या कालावधीत संबंधित व्यक्ती राजासारखं जीवन जगते. प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनात सुख लाभतं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)