चुकूनही या दिशांना पाय करून झोपू नये; आरोग्य बिघडतं, अडचणी वाढत राहतात
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे, यासाठी दिशाही निश्चित केली आहे.
मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा काहींना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नसतं की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणूनबुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, ज्याचा जीवनावर वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे, यासाठी दिशाही निश्चित केली आहे.
शरीरातून ऊर्जा निघून जाते - एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते, कारण चुकीच्या दिशेने पाय ठेवून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.
या दिशेला पाय करून झोपू नये - वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. दक्षिण दिशा ही यमदूत, यम आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये.
advertisement
पूर्व दिशेलाही पाय करू नये - वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला पाय करून झोपू नये. म्हणजे पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपू नये. त्याचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो
चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यास काय होते? वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपली, तर मनात नकारात्मक विचार आणि भीतीदायक स्वप्ने पडतात. याशिवाय व्यक्ती निराशा आणि भीतीचे बळी ठरते.
advertisement
कोणत्या दिशेला पाय करून झोपावे? वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी, शांती, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. याशिवाय पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने ज्ञान मिळते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2024 9:06 AM IST