अयोध्या : रामनगरी अयोध्येमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दिवसेंदिवस याठिकाणी भाविकांची संख्या वाढत आहेत. याठिकाणी प्रत्येक दिवशी 2 ते 3 लाख भाविक रामललाचे दर्शन घेत आहेत. रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट रामललाच्या दर्शनासह रामललाच्या आरतीमध्येही जास्तीत जास्त भाविकांना सहभागी होता यावे, यासाठी योजना तयार करत आहे. जर तुम्हीही अयोध्येला येत असाल आणि तुम्हालाही रामललाचे दर्शन पूजन करू इच्छिता, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
advertisement
राम मंदिराच्या उद्घाटनाला आता लवकरच 2 महिने पूर्ण होणार आहेत. या कालावधीमध्ये लाखो भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. दररोज लाखो भक्त अयोध्येत येत आहेत. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते की आपण रामललाच्या आरतीमध्ये सहभागी व्हावे. त्यामुळे रामललाच्या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी नेमके काय करावे, ही प्रक्रिया नेमकी कशी आहे, हे जाणून घेऊयात.
राम मंदिरात आरतीची वेळ -
प्राण प्रतिष्ठनेनंतर रामललाची 5 वेळा आरती केली जाते. यामध्ये मंगला आरती, श्रृंगार आरती, राजभोग आरती, संध्या आरती आणि शयन आरतीचा समावेश आहे. दिवसाची सुरुवात मंगला आरतीने सकाळी 4:30 वाजता होते. तर दिवसाच्या शेवटची आरती शयन आरती रात्री 10:00 वाजता होते. यामध्ये 2 आरतींमध्ये राम भक्त सहभागी होऊ शकतात.
ऑनलाइन पास बनवण्याची प्रक्रिया -
⦁ ऑनलाइन पाससाठी, सर्व भक्तांना आधी श्री रामजन्मभूमी तीर्थाच्या अधिकृत वेबसाइट srjbtkshetra.org ला भेट द्यावी लागेल.
⦁ त्यानंतर होमपेजवर आरती विभाग निवडावा लागेल.
⦁ तुमच्या मोबाईल नंबरने साइन इन करा आणि तुमच्या नोंदणीसाठी वन-टाइम पासवर्ड (OTP) एंटर करा.
⦁ एकदा लॉग इन केल्यानंतर, आरती किंवा दर्शनासाठी तुमच्या आवडीचा टाइम स्लॉट निवडा
⦁ आता ‘माय प्रोफाइल’वर जा, तुमचा तपशील टाका.