अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. कोट्यवधी राम भक्त या दिवसाची वाट पाहत आहेत. देशात खूप उत्साह पाहायला मिळत आहे. 22 जानेवारीला रामलला आपल्या मंदिरात विराजमान झाल्यावर 23 जानेवारीपासून राम भक्त आपल्या लाडक्या रामललाच्या लाभ घेऊ शकतील.
जेव्हापासून राम मंदिराचे निर्माणकार्य सुरू झाले आहे, तेव्हापासून राम भक्त मोठ्या उदार मनाने मंदिरासाठी दान देत आहेत. नुकतेच राम मंदिर ट्रस्टने निधी समर्पण मोहीम सुरू केली होती. यामध्ये आतापर्यंत 5000 कोटींहून अधिक रक्कम राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी म्हणून मिळाली आहे.
advertisement
मंदिराच्या बांधकामावर खर्च झाल्यानंतरही ट्रस्टच्या बँक खात्यांमध्ये 3500 कोटींहून अधिकची रोकड जमा आहे. तुम्हालाही रामलला मंदिरात दान करायचे असेल तर हा बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हीही राम मंदिरात कशा पद्धतीने दान करू शकता, हे जाणून घेऊया.
राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येकजण या ट्रस्टला देणगी देत आहे. राम भक्त वेगवेगळ्या प्रकारे दान करू शकतात. रोख रक्कम देऊन, ट्रस्टच्या खात्यावर पाठवून किंवा ऑनलाइन माध्यमातूनही देणगी दिली जाऊ शकते.
तसेच जर तुम्ही रोख रक्कम देत असाल तर तुम्हाला लगेच पावती दिली जाईल. याशिवाय, जर तुम्ही ऑनलाइन पेमेंटच्या मदतीने देणगी देत असाल तर तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीवर जनरेट केलेली पावती मिळेल. तसेच बँक खात्यात हस्तांतरण करणारे लोक अधिकृत वेबसाइटवरून पावती घेऊ शकतात.
जाणून घ्या खात्यांची माहिती -
बँक खात्याची सर्व माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटवर दिली आहे. ट्रस्टशी संबंधित सर्व बँक खात्यांची यादी वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. तिथून बँक खात्याचे तपशील पाहून तुम्ही पैसे जमा करू शकता. ट्रस्टने तीन बँक खात्यांचे तपशील जारी केले आहेत. ही 3 खाती स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकेत आहेत.
1. A/c Name :Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra(SBI)
A/C No. :39161495808
IFSC Code: SBIN0002510
Branch :Naya Ghat, Ayodhya, UP
2. A/c Name :Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (BOB)
A/C No. : 05820100021211
IFSC Code :BARBOAYODHY
Branch :Naya Ghat, Ayodhya, UP
3 .A/c Name :Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (PNB)
A/C No. :3865-000-1001-39999
IFSC Code :PUNB0386500
Branch :Naya Ghat, Ayodhya U.P.
जर तुम्ही परदेशात असाल आणि तुमचा निधी राममंदिराला द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही पुढे दिलेला खाते क्रमांक वापरू शकतात.
4. बँक आणि शाखेचे नाव :- भारतीय स्टेट बँक, शाखा:- 11 संसद मार्ग नवी दिल्ली
खाते क्रमांक :- 42162875158
IFSC Code: – SBIN0000691
खातेधारकाचे नाव :- श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र