जया एकादशी 2026: तिथी आणि वेळ
पंचांगानुसार, 2026 मध्ये जया एकादशीचा प्रारंभ 28 जानेवारी 2026, बुधवारी सायंकाळी 04:35 वाजता सुरु होणार आहे. तर या एकादशीची समाप्ती 29 जानेवारी 2026, गुरुवारी दुपारी 01:55 वाजता होईल.
व्रत कधी करावे?
हिंदू धर्मात 'उदयातिथी' महत्त्वाची मानली जाते. 29 जानेवारी रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने, जया एकादशीचे व्रत गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी पाळणे शास्त्रोक्त ठरेल. विशेष म्हणजे, गुरुवार हा भगवान विष्णूंचाच वार असल्याने या दिवशी एकादशी येणे अत्यंत शुभ मानले जात आहे.
advertisement
जया एकादशीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
1. उदयातिथीचे महत्त्व: 28 जानेवारीला सायंकाळी तिथी सुरू होत असली तरी, उपवासाचा पूर्ण दिवस 29 जानेवारीला मिळत आहे. त्यामुळे 29 जानेवारीलाच उपवास करावा आणि विष्णूंची उपासना करावी.
2. व्रत सोडण्याची वेळ: एकादशीचे व्रत सोडण्यासाठी द्वादशी तिथीचा काळ महत्त्वाचा असतो. जया एकादशीचे पारण 30 जानेवारी 2026, शुक्रवारी सकाळी 07:10 ते 09:20 या वेळेत करणे सर्वात फलदायी ठरेल.
3. पिशाच योनीतून मुक्ती: पौराणिक कथेनुसार, माल्यवान आणि पुष्पवती नावाच्या गंधर्व जोडप्याला शापामुळे पिशाच व्हावे लागले होते. अनवधानाने त्यांच्याकडून जया एकादशीचे व्रत घडले आणि त्यांना पुन्हा दिव्य रूप प्राप्त झाले. म्हणून याला 'मुक्ती देणारी एकादशी' म्हणतात.
4. पूजेचा शुभ मुहूर्त: 29 जानेवारी रोजी सकाळी 07:11 ते 08:32 पर्यंत पूजेचा पहिला शुभ मुहूर्त आहे. तर दुपारी 11:14 ते 01:55 या वेळेतही तुम्ही विशेष पूजा करू शकता. या दिवशी रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्रांचा शुभ संयोग आहे.
5. काय खावे आणि काय टाळावे? या दिवशी तांदूळ खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. फलाहार किंवा सात्त्विक भोजन घ्यावे. मध आणि हरभरा डाळीचे पदार्थ खाणे टाळावे, असे शास्त्रात सांगितले आहे.
6. दानाचे महत्त्व: माघ महिन्यात थंडी अधिक असल्याने या दिवशी गरजू व्यक्तींना गरम कपडे, ब्लँकेट किंवा अन्नदान केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
