TRENDING:

Jyotish Tips: आरोग्याच्या तक्रारी आयुष्यभर! अशुभ ज्वालामुखी योगात जन्म होऊ नये असं का म्हणतात?

Last Updated:

Jwalamukhi Yog 2026 Date: अशुभ योगांमध्ये ज्वालामुखी योगाचा समावेश होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते, कारण त्याचे परिणाम चांगले मिळत नाहीत. वर्ष 2026 मधील पहिला ज्वालामुखी योग फेब्रुवारी महिन्यात येत आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक चांगले वाईट योग असतात, ज्यामध्ये काही शुभ फळदायी मानले जातात, तर काही अशुभ फळ देणारे असतात. अशुभ योगांमध्ये ज्वालामुखी योगाचा समावेश होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते, कारण त्याचे परिणाम चांगले मिळत नाहीत. वर्ष 2026 मधील पहिला ज्वालामुखी योग फेब्रुवारी महिन्यात येत आहे, जो सकाळपासून दुपारपर्यंत असेल. ज्वालामुखी योग एकूण 5 तिथींना विशिष्ट नक्षत्रांच्या उपस्थितीत तयार होतो.
News18
News18
advertisement

वर्ष 2026 मधील पहिला ज्वालामुखी योग -

ज्वालामुखी योग तयार होण्यासाठी प्रतिपदा तिथीला मूळ नक्षत्र, पंचमीला भरणी नक्षत्र, अष्टमीला कृत्तिका नक्षत्र, नवमीला रोहिणी नक्षत्र किंवा दशमी तिथीला आश्लेषा नक्षत्र असते.

पंचांगानुसार, 24 फेब्रुवारी मंगळवार रोजी अष्टमी तिथी सकाळी 07:01 वाजता सुरू होत आहे, तर कृत्तिका नक्षत्र पहाटेपासून दुपारी 03:07 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे वर्षातील पहिला ज्वालामुखी योग 24 फेब्रुवारीला तयार होत आहे. हा योग सकाळी 07:01 ते दुपारी 03:07 वाजेपर्यंत असेल.

advertisement

कारच्या डॅशबोर्डवर देवतांच्या मूर्ती लावणाऱ्यांना हे नियम माहीत हवेत; वेळीच..

वर्षातील दुसरा ज्वालामुखी योग -

यानंतर दुसरा ज्वालामुखी योग लगेचच 25 फेब्रुवारीला सकाळी 04:51 वाजता सुरू होईल आणि दुपारी 01:38 वाजेपर्यंत राहील. या दिवशी नवमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगामुळे हा योग बनला आहे. 

advertisement

24 तासात होत्याचं नव्हतं..! 21 फेब्रुवारीला 3 राशींच्या सुखाला दृष्ट लागणार

ज्वालामुखी योगात काय करू नये?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

जेव्हा ज्वालामुखी योग असतो, तेव्हा गृहप्रवेश, विवाह, साखरपुडा, मुंज यांसारखी शुभ कार्ये करू नयेत, कारण ती अशुभ फलदायी ठरतात. ज्वालामुखी योगामध्ये नवीन काम किंवा व्यवसायाची सुरुवात करू नका. या काळात घर, दुकान, वाहन किंवा इतर मालमत्तेची खरेदी करणे टाळावे. या अशुभ योगात नवीन घराच्या बांधकामाचा शुभारंभ (पायाभरणी) करू नये. जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो, मात्र ज्वालामुखी योगामध्ये ज्यांचा जन्म होतो, त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या इतर लोकांच्या तुलनेत अधिक जाणवू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Jyotish Tips: आरोग्याच्या तक्रारी आयुष्यभर! अशुभ ज्वालामुखी योगात जन्म होऊ नये असं का म्हणतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल