TRENDING:

कामदा एकादशीला चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा वर्षभर करावा लागेल आर्थिक तंगीचा सामना!

Last Updated:

हिंदू धर्मात एकादशीच्या व्रतांना विशेष महत्त्व आहे, परंतु चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी कामदा एकादशी विशेष मानली जाते. मान्यतेनुसार, हे व्रत सर्व इच्छा पूर्ण करते आणि अजाणतेपणी होणाऱ्या पापांपासून मुक्ती देते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kamada Ekadashi 2026 : हिंदू धर्मात एकादशीच्या व्रतांना विशेष महत्त्व आहे, परंतु चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी कामदा एकादशी विशेष मानली जाते. मान्यतेनुसार, हे व्रत सर्व इच्छा पूर्ण करते आणि अजाणतेपणी होणाऱ्या पापांपासून मुक्ती देते. पंचांगानुसार, 2026 मध्ये कामदा एकादशीचे व्रत रविवार, 29 मार्च रोजी पाळले जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी थोडा जरी हलगर्जीपणा केल्यास भगवान विष्णू क्रोधित होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक संकट ओढवते.
News18
News18
advertisement

कामादा एकादशीला 'या' गोष्टी चुकूनही करू नका

तांदळाचे सेवन टाळा

हिंदू धर्मात सर्व एकादशींना तांदूळ खाणे वर्ज्य मानले जाते. शास्त्रानुसार, एकादशीला तांदूळ खाणे म्हणजे 'मिळवलेले पुण्य नष्ट करणे' असे मानले जाते. यामुळे घरात दरिद्रता येते, म्हणून या दिवशी चुकूनही तांदूळ किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नका.

तुळशीची पाने तोडू नका

advertisement

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे महापाप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी तुळशी माता स्वतः भगवान विष्णूसाठी व्रत करते. त्यामुळे पूजेसाठी तुळशीची पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावीत.

कठोर शब्द आणि वादावादी टाळा

ज्या घरात कलह, वाद किंवा मोठ्यांचा अपमान होतो, तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. कामदा एकादशीच्या दिवशी कोणाचीही निंदा करू नका किंवा कोणालाही अपशब्द बोलू नका. शांत आणि संयमी राहिल्यानेच व्रताचे पूर्ण फळ मिळते.

advertisement

केस आणि नखे कापू नका

एकादशीच्या दिवशी केस कापणे, नखे काढणे किंवा दाढी करणे अशुभ मानले जाते. या क्रियांमुळे जीवनातील प्रगती खुंटते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात, असा इशारा ज्योतिषशास्त्राने दिला आहे.

तामसिक भोजन आणि व्यसन

या दिवशी कांदा, लसूण, मांस, मदिरा किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. कामदा एकादशी हा शुद्ध सात्त्विकतेचा दिवस आहे. तामसिक पदार्थांच्या सेवनाने मनातील नकारात्मकता वाढते आणि पूजेत मन लागत नाही.

advertisement

दिवसा झोपणे टाळा

एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणे शास्त्रानुसार वर्ज्य आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती एकादशीला दिवसा झोपतो, त्याचे नशीबही झोपते. हा दिवस नामस्मरण, भजन आणि आध्यात्मिक वाचनासाठी घालवावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा, मराठी चित्रपटसृष्टीसाठी हक्काचं थिएटर, भारत माता सिनेमा पुन्हा सुरू, Video
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
कामदा एकादशीला चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा वर्षभर करावा लागेल आर्थिक तंगीचा सामना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल