TRENDING:

लक्ष्मीकृपेसाठी घरात आवर्जून ठेवा या 5 वस्तू, कायम राहील सकारात्मक ऊर्जा

Last Updated:

कमळाचे फूल देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या फुलावर लक्ष्मीचा वास असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 16 ऑगस्ट:  ज्या घरात वातावरण स्वच्छ, शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते, त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या 5 शुभ गोष्टी तुमच्या घरी नक्की ठेवा.
News18
News18
advertisement

या राशींची जोडी असते सर्वात शक्तिशाली, तुमच्या जोडीदाराची वैशिष्ट्ये!

मोरपंख

घराच्या मंदिरात मोरपंख ठेवणे खूप शुभ मानले जाते. ज्या घरात मोरपंख असते, तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते आणि अशा घरात देवी लक्ष्मीचाही वास असतो.

कमळाचे फूल

कमळाचे फूल देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या फुलावर लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच देवी लक्ष्मीला तिच्या पूजेमध्ये कमळाचे फूल नक्कीच अर्पण केले जाते. लक्ष्मीच्या पूजेमध्ये रोज कमळाचे फूल अर्पण करावे.

advertisement

गंगेचे पाणी

हिंदू धर्मात गंगेचे पाणी पवित्र पाणी मानले जाते. त्यामुळे वर्षानुवर्षे ते खराब होत नाही. गंगाजल घरात ठेवावे आणि वेळोवेळी घरभर शिंपडावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

देवी दुर्गेच्या या मंदिरात जायला घाबरतात लोक! काय आहे रहस्य जाणून घ्या

दक्षिणावर्ती शंख

दक्षिणावर्ती शंख पूजागृहात ठेवणे खूप शुभ मानले जाते. हा शंख लक्ष्मीशी संबंधित आहे. म्हणूनच ज्या घरात दक्षिणावर्ती शंख आहे, तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. तर शुक्रवारी देवी लक्ष्मीचा अभिषेक दक्षिणावर्ती शंखाने करावा.

advertisement

श्रीयंत्र

पूजेच्या खोलीत श्रीयंत्र ठेवावे. श्रीयंत्राचा संबंध लक्ष्मीशीही आहे. शुक्रवारी लाल कापड पसरून पूजागृहात श्रीयंत्राची स्थापना करू शकता.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
लक्ष्मीकृपेसाठी घरात आवर्जून ठेवा या 5 वस्तू, कायम राहील सकारात्मक ऊर्जा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल