देवी दुर्गेच्या या मंदिरात जायला घाबरतात लोक! काय आहे रहस्य जाणून घ्या
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
या दुर्गेच्या मंदिरात जायला लोक घाबरतात
मुंबई, 14 ऑगस्ट: नवरात्रात लोक मोठ्या भक्तीभावाने दुर्गादेवीची पूजा करतात. मातृदेवतेची पूजा करण्यासोबतच लोक उपवासही करतात. श्रद्धा अशीही आहे की, देवीच्या मंदिरात खऱ्या मनाने मागितल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते. पण मध्य प्रदेशातील देवासमध्ये बांधलेले देवीचे मंदिर वेगळीच कहाणी सांगत आहे. या दुर्गेच्या मंदिरात जायला लोक घाबरतात. नवरात्रीच्या काळात लोक या मंदिरात जात नाहीत, तर बाहेरून डोके टेकवून परततात. या मंदिराचे रहस्य काय आहे ते जाणून घेऊया.
शापित आहे हे मंदिर
असे म्हटले जाते की हे मंदिर शापित आहे आणि सूर्यास्तानंतर येथे कोणी जात नाही. लोकांच्या श्रद्धेनुसार, सूर्यास्तानंतर कोणतीही व्यक्ती येथे आली असेल, त्याच्यासोबत विचित्र घटना घडल्या आहेत. एवढेच नाही तर या मंदिरातून भीतीदायक आवाजही येतात. कधी मंदिरात सिंह गर्जना, तर कधी घंटांचा आवाज येतो असे लोक सांगतात. या मंदिरात चुकीच्या उद्देशाने येणाऱ्या व्यक्तीचे नेहमीच नुकसान होते असे म्हटले जाते.
advertisement
मंदिरामागील रहस्य काय आहे?
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार देवासच्या महाराजांनी हे दुर्गा मंदिर बांधले होते. मात्र, त्याचे बांधकाम झाल्यानंतर राजघराण्यात अशुभ घटना घडू लागल्या. मंदिराच्या आजूबाजूला राहणारे लोक असेही सांगतात की, येथील राजकन्येचे सेनापतीसोबत प्रेमसंबंध होते. राजाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्याने या नात्याला विरोध केला. राजाने मुलीला तुरुंगात टाकले. राजकन्येचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी राजकन्येच्या मृत्यूची बातमी कळताच सेनापतीनेही मंदिरात आत्महत्या केली. त्यानंतर राजपुरोहितांनी सांगितले की, हे मंदिर अपवित्र झाले आहे. राजपुरोहित यांच्या सांगण्यावरून राजाने पूर्ण आदराने मातेची मूर्ती उज्जैनच्या मोठ्या गणेश मंदिरात बसवली असे म्हणतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
First Published :
August 14, 2023 1:56 PM IST