उज्जैन : हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, आज 19 एप्रिल रोजी कामदा एकादशी (Kamada Ekadashi 2024) चा उपवास केला जाणार आहेत. या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती राक्ष योनीतून मुक्ती मिळवतो. हा उपवास केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते, असेही मानले जाते. त्यामुळे या एकादशीला फलदा एकादशी असेही म्हणतात.
त्यामुळे या एकादशीचे विशेष महत्त्व काय आहे, तसेच या एकादशीची नेमकी कथा काय आहे, हे जाणून घेऊयात. याबाब लोकल18 च्या टीमने मध्य प्रदेशातील उज्जैनचे ज्योतिष आचार्य रवि शुक्ला यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या एकदशीचे महत्त्व आणि कथा सांगितली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी का शुभारंभ 18 अप्रैल 2024 सायंकाळी 5 बजकर 31 मिनिटांनी असेल. या एकादशीची समाप्ती ही आज 19 एप्रिलला रात्री 8 वाजून 4 मिनिटांनी होईल. अशा परिस्थितीत कामदा एकादशीचा उपवास हा 19 एप्रिल रोजी करण्यात येईल.
photos : याठिकाणी जळत्या चितांमध्ये नृत्य करतात महिला, शेकडो वर्षांची ही परंपरा नेमकी काय?
कामदा एकादशीच्या उपवासाची कथा -
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, कामदा एकादशीचे पुराणांतही वर्णन आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला कामदा एकादशीची कथा ऐकवली होती. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी भोगीपुरमध्ये पुंडरीक नावाचा एक राजा होता. तो नेहमी भोग-विलासात राहायचा. त्याच्या राज्यात ललित आणि ललिता नावाचे स्री-पुरुष राहत होते. त्या दोघांमध्ये अतूट प्रेम होते. एक दिवस राजाच्या सभेत ललित गायन करत होता. त्याचवेळी त्याचे लक्ष हे ललितावर गेले. त्यामुळे त्याचा स्वर बिघडला. त्याच्या गाण्यात व्यत्यय निर्माण झाला. हे पाहून राजा पुंडरिक याला प्रचंड राग आला आणि त्याने रागाच्या भरात राक्षस बनण्याचा श्राप दिला.
यानंतर आपल्या पतीची ही अवस्था पाहून ललिता दुखी झाली. तिने आपल्या पतीला ठिक करण्यासाठी अनेक लोकांपासून मदत मागितील. तेव्हा कुणाच्या तरी सांगण्यावरुन ललिता विंध्याचल पर्वतावर श्रृंगी ऋषिच्या आश्रमावर पोहोचली. त्याठिकाणी जाऊ तिने आपली व्यथा ऋषीसमोर व्यक्त केली. यानंतर ऋषीने तिला कामदा एकादशीचा व्रत करण्यास सांगितले. या उपवासाच्या महिमेने तुझा पती ललित पुन्हा मनुष्य योनीत परत येईल.
त्यामुळे मग ऋषीच्या सांगण्यावरुन तिने भगवान विष्णुचे ध्यान करत विधीनुसार, कामदा एकादशीचा उपवास केला. तसेच उपवास पूर्ण झाल्यावर भगवान विष्णुच्या कृपेन ललित पुन्हा मनुष्य योनीत परतला. याप्रारे दोघांना आपल्या आयुष्यातील कष्टापासून मुक्ती मिळाली. यामुळे मग यानंतरही तो दोन्ही काय कामदा एकादशीचा उपवास करू लागले. त्यामुळे शेवटी त्यांना याचा फायदा म्हणून दोघांना मोक्षाची प्राप्ती झाली.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी चर्चा केल्यानंतर लिहिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.