photos : याठिकाणी जळत्या चितांमध्ये नृत्य करतात महिला, शेकडो वर्षांची ही परंपरा नेमकी काय?

Last Updated:
महादेवाची नगरी काशी म्हणजे वाराणसीला पंरपरेचं शहर म्हटले जाते. या शहरात अशा काही परंपरा आहेत, ज्या जगात कुठेच पाहायला मिळणार नाहीत. अशीच एक अनोखी परंपरा आहे, काशी येथील महास्मशानभूमी वर जळणाऱ्या चितांमध्ये येथील नगरवधू यांचे नृत्य. या परंपरेचा इतिहास तब्बल 400 वर्षे जुना आहे. ही परंपरा नेमकी काय आहे, यामागचा इतिहास नेमका काय आहे हे जाणून घेऊयात. (अभिषेक जायसवाल /वाराणसी)
1/8
लोक मान्यता अशी आहे की, जी नगरवधू मसान नाथ बाबाच्या या उत्सवात सहभागी होते आणि महास्मशानभूमीत नृत्य करते तिला पुढच्या जन्मात या नारकीय जीवनातून मुक्ती मिळते.

advertisement
2/8
या कारणामुळे वाराणसी आणि आजूबाजूच्या परिसरातील नगर वधू नवरात्रीच्या सप्तमी तिथीला याठिकाणी हजेरी लावतात. तसेच जळणाऱ्या चितांच्या मध्ये नृत्य करतात.

3/8
गाणी, संगीत आणि घुंगरूंच्या आवाजाचा असा अद्भुत संगम फक्त काशीतच पाहायला मिळतो.

4/8
नगर वधूंच्या या नृत्याच्या आयोजनाच्या आधी मसान नाथ बाबाचा श्रृंगार केला जातो. तसेच मग तंत्र विधीने त्यांची पुजा केली जाते.

5/8
आयोजक गुलशन कपूर यांनी माहिती देताना सांगितले की, राजा मान सिंह यांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे. 1585 मध्ये राजा मान सिंह यांनी या महास्मशानभूमीत बाबा मसान नाथ यांचे मंदिर बांधले होते.

6/8
यानंतर त्यांनी याठिकाणी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील प्रसिद्ध संगीतकारांना आमंत्रण पाठवले होते. मात्र, त्यावेळी महास्मशान असल्याने तेथे कुणीही आले नाही.

7/8
मग नंतर राजा मानसिंह यांनी नगर वधुंना यासाठी आमंत्रित केले आणि नगर वधुंनी त्यांचे आमंत्रण स्विकार केले आणि याठिकाणी येऊन संपूर्ण रात्रभर आपली नृत्यांजली अर्पित केली. तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे.

8/8
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही संबंधितांशी चर्चा केल्यानंतर लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल-18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement