अंबिकापूर, 2 ऑक्टोबर : धार्मिक मान्यतेनुसार, कावळ्याला यमाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पितृपक्षात पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कावळ्यांना जेवण दिलं जातं. कावळ्यांच्या आजूबाजूला आपल्या पितरांचा वास असतो असं मानलं जातं.
भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ते अश्विन मासातील अमावस्या या 15 दिवसांच्या पितृपक्षात आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध कार्य केले जातात. या कार्यामुळे आपल्या आयुष्यात विविध मार्गाने सुख, समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात कावळ्यांना भोजन देण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
घराच्या 'या' कोपऱ्यात लावा गोकर्ण, नांदेल सुख-समृद्धी!
या गावात येत नाही एकही कावळा
पितृपक्षात कावळ्याला भोजन देण्याची प्रथा असली, तरी एक गाव असं आहे जिथे एकही कावळा येत नाही. रामायणकाळापासून पहाडगावात कावळे येत नाहीत, असं म्हटलं जातं. शिवाय त्यामागे एक खास अख्यायिकाही आहे.
भगवान श्रीराम हे वनवासात असताना सरगुजाच्या रामगडला गेले होते. तेव्हा लक्ष्मण पर्वत अशारितीने जोडत होते की, रामगडहून श्रीलंका स्पष्टपणे दिसू शकेल. मात्र याबाबत सूरजपूरच्या पहाडगावहून कावळे रामाचं सर्व बोलणं रावणाला जाऊन सांगत होते. त्याचदरम्यान लक्ष्मणने कावळ्याच्या डोळ्यात बाण मारला, तेव्हापासून इथे आजवर एकही कावळा दिसला नाही, अशी मान्यता आहे. तर दुसरीकडे या परिसरात रासायनिक फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने इथे कावळे नसतात, असं म्हटलं जातं.
दरम्यान, असंही म्हणतात की, पहाडगावच्या पर्वतांमध्ये आजही लक्ष्मणाच्या पंजाचे ठसे आढळतात. वनवासकाळाची ही खूण असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, याठिकाणी कावळे येत नसल्याने गावकऱ्यांना पितृपक्षात कावळ्याला भोजन देता येत नाही. परिणामी पितृपक्षातील हा विधी पूर्ण होत नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)