पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी लावा तिळाचा दिवा, मिळेल वंशवाढीचा आशीर्वाद; पण हे नियम लक्षात ठेवा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मातीच्या एका लहानशा दिव्यात मोहरीचं तेल घ्यावं, त्यात वात ठेवावी. दक्षिण दिशेत ठेवलेल्या या दिव्यात एक काळं तीळ घालावं.
अनुज गौतम, प्रतिनिधी
सागर, 1 ऑक्टोबर : भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ते अश्विन मासातील अमावस्या या 16 दिवसांच्या पितृपक्षात आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी विविध कार्य केले जातात. या कार्यामुळे आपल्या आयुष्यात विविध मार्गाने सुख, समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात तिळाचा दिवा लावण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्यास वंशवाढ होते, अशी मान्यता आहे.
advertisement
श्राद्धकर्म करताना चार कार्य न चुकता करण्याचा सल्ला दिला जातो. ते म्हणजे पहाटे नदी किंवा तलावावर जाऊन ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार आपल्या पूर्वजांच्या आठवणींना उजाळा द्यावा, त्यांना नैवेद्य दाखवावं. त्यानंतर जेवण चार भागांत विभागून कावळा, कुत्रा, गाय आणि कन्येला द्यावं. हवन करावं. त्यात 3 साखरेची, 3 तुपाची आणि एक धुपाची आहुती द्यावी. त्यानंतर मोहोरीच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेत तेवत ठेवावा.
advertisement
वंशवाढीसाठी लावा तिळाचा दिवा
ज्योतिषी यशवर्धन चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंशवाढीसाठी मातीच्या एका लहानशा दिव्यात मोहोरीचं तेल घ्यावं, त्यात वात ठेवावी. दक्षिण दिशेत ठेवलेल्या या दिव्यात एक काळं तीळ घालावं.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिळाच्या दिव्यात आणखी दोन तीळ घालावे. त्याच्या पुढील दिवशी तीन तीळ अशाप्रकारे 16 दिवसांनी 16 तिळांचा दिवा लावावा. लक्षात घ्या, या तिळाचा दिवा काही वेळासाठीच लावला जातो. म्हणजे 10 ते 15 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास.
view commentsLocation :
Sagar,Madhya Pradesh
First Published :
October 01, 2023 5:48 PM IST
मराठी बातम्या/देश/
पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी लावा तिळाचा दिवा, मिळेल वंशवाढीचा आशीर्वाद; पण हे नियम लक्षात ठेवा


