advertisement

कमाल केली! काजूच्या टाकाऊ टरफलांतून शोधला रोजगार; खेडच्या स्पंदनचा राज्यस्तरावर सलग दुसऱ्यांदा सन्मान

Last Updated:
कोकणच्या सुपुत्राची विज्ञानात गरुडझेप! काजू टरफलांपासून रोजगाराची संधी शोधणाऱ्या 'कॅश्युशेलोरा'चा राज्यस्तरावर डंका
1/7
कोकणात काजू सोलल्यावर फेकून दिलेल्या टरफलांकडे पाहून या मुलाला कचरा नाही, तर आपल्या गावातल्या काकू-मावशींच्या हाताला मिळणारा रोजगार दिसला. वयाच्या ज्या वयात मुलं खेळण्यात दंग असतात, तिथे स्पंदनने सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरावर झेंडा फडकवलाय. ही केवळ एका पुरस्काराची गोष्ट नाही, तर कोकणच्या एका मुलाने आपल्या मातीतील टाकाऊ वस्तूंना दिलेलं मोल आहे.

2/7
कोकणात काजूगर काढल्यानंतर फेकून दिली जाणारी टरफले आता महिलांच्या रोजगाराचे साधन ठरू शकतात, हे खेडच्या विद्यार्थ्याने आपल्या प्रोजक्टमधून करून दाखवले आहे. नागपूर इथे पार पडलेल्या ५३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 'कॅश्युशेलोरा' या प्रकल्पाने राज्यस्तरावर पाचवा क्रमांक पटकावला.

3/7
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, विभागीय शिक्षण विभाग नागपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नागपूर शिक्षणाधिकारी यांच्यावतीने हे प्रदर्शन झाले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित विज्ञान महाविद्यालय नागपूर येथे हे प्रदर्शन झाले.

4/7
या प्रदर्शनात ६ वी ते ८ वी या वयोगटात स्पंदन धामणे याने आपली ही प्रतिकृती सादर केली होती. विशेष म्हणजे, स्पंदनच्या विज्ञान मॉडेलला राज्यस्तरावर सलग दुसऱ्या वर्षी पाचवा क्रमांक मिळवला आहे. या यशाने त्याच्या जिद्दीचे आणि कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

5/7
कोकणातील काजू उत्पादनावर आधारित हा प्रकल्प अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. काजूची फेकून दिली जाणारी टरफले वापरून त्यातून तेल काढण्याचे हे तंत्र आहे. या तेलाचा वापर शेती आणि औद्योगिक क्षेत्रात होऊ शकतो. हे उपकरण सौर ऊर्जेवर चालते, ज्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होते.

6/7
हे यंत्र महिला बचत गटांना दिल्यास घरकाम सांभाळून त्या स्वतःचे उत्पन्न वाढवू शकतात आणि स्वयंसिद्धा बनू शकतात,
हे यंत्र महिला बचत गटांना दिल्यास घरकाम सांभाळून त्या स्वतःचे उत्पन्न वाढवू शकतात आणि स्वयंसिद्धा बनू शकतात," असा विश्वास स्पंदनने व्यक्त केला. खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्हा स्तरावर स्पंदन धामणे आणि अर्णव परकाळे या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला होता.
advertisement
7/7
या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन आई सौ. शर्वरी धामणे, वडील डॉ. गौरव धामणे यांच्यासह रोटरी स्कूलच्या सर्व विज्ञान शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मोलाची साथ लाभल्याचं स्पंदनं सांगितलं.  या मोठ्या यशाबद्दल रोटरी प्रतिष्ठान खेडचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिका पटेल आणि इतर मान्यवरांनी स्पंदन व त्याच्या मार्गदर्शक टीमचे भरभरून अभिनंदन केलं.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement