advertisement

महाशिवरात्रीआधी मोठा निर्णय, वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात गाभारा दर्शन बंद, कारण काय?

Last Updated:

Grishneshwar Darshan: ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या काळात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

महाशिवरात्रीआधी मोठा निर्णय, वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात गाभारा दर्शन बंद, कारण काय?
महाशिवरात्रीआधी मोठा निर्णय, वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात गाभारा दर्शन बंद, कारण काय?
‎छत्रपती संभाजीनगर: येत्या 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे. या काळात विविध शिवमंदिरे आणि 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. वेरूळ येथे बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर असून इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. मात्र, या काळातील वाढती गर्दी लक्षात घेता महाशिवरात्रीला श्री घृष्णेश्वरांचे हात लावून व डोके टेकून दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना गाभाऱ्याच्या दरवाजातून दर्शन घ्यावे लागेल.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 3) आढावा बैठक झाली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ‎भाविकांना ओंकारेश्वरच्या धर्तीवर घृष्णेश्वराचा जलाभिषेक बाहेरून करता येईल, तसेच गर्दीचा विचार करता व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. गावातील नागरिकांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहापर्यंत दर्शन मिळणार असून, भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. दर्शन रांगेतच बाहेर प्रसाद वाटप करता येईल, असे देवस्थानचे उपाध्यक्ष टोपरे यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे यात्रा भरते, देशभरातून लाखो भाविक येतात. गाभारा दर्शन सुरू ठेवल्यास चार ते पाच तास लागतात. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन यंदा दरवाजातून मुखदर्शनाचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
देवस्थान कार्यालयातील आढावा बैठकीस जिल्हाधिकारी स्वामी यांच्यासह पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, सरपंच प्रकाश पाटील, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष योगेश टोपरे, विश्वस्त संजय वैद्य, राजेंद्र कौशिके आदी उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
महाशिवरात्रीआधी मोठा निर्णय, वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात गाभारा दर्शन बंद, कारण काय?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement