advertisement

9 वर्षाची वृंदा जेवायला आलीच नाही,आई रूममध्ये पाहायला गेली अन्...कुटुंबियांनी फोडला हंबरडा

Last Updated:

घरात झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसल्याने एका नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली.

News18
News18
बीड : लहान मुलाकडे केलेले छोटेसे दुर्लक्ष जीव घेणे ठरू शकते असाच काही प्रकार बीडच्या माजलगाव शहरात घडला आहे. घरात झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसल्याने एका नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली. वृंदा समीर रुद्रवार असे या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात घर आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची 9 वर्षांची नात वृंदा ही आपल्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या झोक्यावर लहान बहिणीसह खेळत होती. खुर्चीवर चढून झोका हातात घेत असताना खुर्ची खाली कलंडली आणि वृंदाला झोक्याचा गळफास बसला. यात वृंदाचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

रुद्रवार परिवारावर शोककळा  

मुलगी जेवायला खाली का आली नाही हे पाहण्यासाठी तिची आई वर आली असता तिला मुलीला गळफास बसल्याचे दिसले. मुलीला पाहून आईने हंबरडा फोडला. आईचा आवाज ऐकून आजी, आजोबा, वडील धावत आले. त्यांनी तात्काळ वृंदाला हॉस्पिटलला नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वृंदा ईगलवुड शाळेत दुसरी वर्गात शिकत होती. तिच्या आकस्मित मृत्यूने रुद्रवार परिवारावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement

घटनेने पालकांना तसेच नातेवाईकांना धक्का बसला

अचानक घडलेल्या या घटनेने पालकांना तसेच नातेवाईकांना धक्का बसला आहे. खेळताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे किती आवश्यक आहे, याची जाणीव या प्रसंगाने सर्वांना झाली आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी घरगुती खेळणी आणि झोके वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहे. वृंदाच्या निधनामुळे परिसर शोकमग्न झाला असून वातावरणात हळहळ दाटून आली. छोट्याशा खेळाने एका निष्पाप जीवाचा बळी घेतल्याने संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
9 वर्षाची वृंदा जेवायला आलीच नाही,आई रूममध्ये पाहायला गेली अन्...कुटुंबियांनी फोडला हंबरडा
Next Article
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
  • नव्या आर्थिक वर्षाचे रेडी रेकनर दर फायनल

  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

  • महसूल विभागाचे नवे नोटिफिकेशन

View All
advertisement