advertisement

IPL 2026 : मुंबईच्या मॅचनंतर ब्रॉडकास्टरचा गूढ मृत्यू, हॉटेल रूममध्ये काय झालं? BCCI ची पहिली रिएक्शन!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यानंतर बीसीसीआयच्या अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा गूढ मृत्यू झाला.

मुंबईच्या मॅचनंतर ब्रॉडकास्टरचा गूढ मृत्यू, हॉटेल रूममध्ये काय झालं? BCCI ची पहिली रिएक्शन!
मुंबईच्या मॅचनंतर ब्रॉडकास्टरचा गूढ मृत्यू, हॉटेल रूममध्ये काय झालं? BCCI ची पहिली रिएक्शन!
मुंबई : आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यानंतर बीसीसीआयचे अनुभवी ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विलियम लँगफोर्ड यांचा गूढ मृत्यू झाला. 30 मार्चला सकाळी हॉटेल रूममध्ये लँगफोर्ड बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडले, यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी लँगफोर्ड यांना मृत घोषित केलं. लँगफोर्ड मुंबईमध्ये आयपीएल 2026 च्या ब्रॉडकास्ट टीमचा महत्त्वाचा भाग होते.
बीसीसीआयने इयान विलियम लँगफोर्ड यांच्या मृत्यूवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल ब्रॉडकास्ट इंजिनिअर इयान विलियम लँगफोर्ड यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करते. लँगफोर्ड आमच्या ब्रॉडकास्ट टीमचे अविभाज्य भाग होते. लँगफोर्ड यांचे कुटुंबिय आणि मित्रांसोबत आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत', अशी अधिकृत प्रतिक्रिया बीसीसीआयने दिली आहे.
'या अत्यंत कठीण काळात लँगफोर्ड यांच्या कुटुंबियांना आवश्यक असलेलं सर्व सहकार्य करण्यासाठी आयपीएल कटिबद्ध आहे. आयपीएलच्या सुरळीत कामकाजात सहभागी असलेल्या प्रत्येक सदस्याचे आरोग्य, सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे', असं आश्वासनही आयपीएलने दिलं आहे.
advertisement

कोण होते विलियम लँगफोर्ड?

विलियम लँगफोर्ड हे 76 वर्षीय ब्रिटिश नागरिकी होते. आयपीएल ब्रॉडकास्टिंगच्या कामासाठी लँगफोर्ड हे मुंबईमध्ये आले होते. 24 मार्चपासून लँगफोर्ड ट्रायडेंट हॉटेलमध्ये राहत होते. मुंबई आणि केकेआर यांच्यातल्या सामन्याचं काम संपवून लँगफोर्ड 29 मार्च रोजी रात्री उशिरा हॉटेल रूममध्ये परतले.
मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या माहितीनुसार 30 मार्च रोजी सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना लँगफोर्ड त्यांच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
प्राथमिक तपासामध्ये कोणत्याही घातपाताचा प्रकार आढळून आलेला नाही, अशी माहिती मरीन ड्राइव्ह पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. लँगफोर्ड यांच्या शवविच्छेदनातही संशयास्पद काहीही आढळलेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात झाली, पहिला सामना आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात झाला, याच सामन्यानंतर लँगफोर्ड यांचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुंबईच्या मॅचनंतर ब्रॉडकास्टरचा गूढ मृत्यू, हॉटेल रूममध्ये काय झालं? BCCI ची पहिली रिएक्शन!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement