Aajache Rashibhavishya: संकटाचे डोंगर सरले, आता तुमचे दिवस आले, पण बुधवारी ‘या’ चुका टाळाच, आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: 4 फेब्रुवारीचा दिवस मेष ते मीन राशींसाठी खास असेल. तुमच्या नशिबात काय लिहलंय? हे ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
मेष राशी - व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल परंतु, ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. आजचा तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. काळजी करण्याचा दिवस - तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे - म्हणून मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. विवाहित लोकांना आज आनंदवार्ता लाभेल. हातात घेतलेले काम पूर्ण करा. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
सिंह राशी - आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की, पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
कन्या राशी - चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पनादेखील मांडा. तुमचा शुभ अंक आज 6 आहे.
advertisement
तुळ राशी - लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकतात. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे - परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
धनु राशी - अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
मकर राशी - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. आज तुमचा शुभ अंक 4 आहे.
advertisement
मीन राशी - तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. जमिनी संदर्भातील प्रश्न सुटतील. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.
advertisement








