भगवान शंकराच्या मंदिरात आपण जेव्हा दर्शन घेण्यासाठी जातो त्यावेळेस जेव्हा आपण शिवलिंगाचे दर्शन घेतो दर्शन घेताना आपण तीन वेळेस टाळ्या वाजवतो ते याकरिता की शिव पुराना मध्ये यासाठी वेगवेगळ्या कथा सांगितलेले आहेत त्या अशा या तीन टाळ्या म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यातील देवांच्या टाळ्या असतात. आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकरांना कळावं की आपण मंदिरामध्ये आलो आहोत त्यांच्या दर्शनाकरता.
advertisement
या तीन टाळ्या वाजवल्या जातात. कारण की भगवान शंकर हे रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन असतात आणि त्यांना माहिती व्हावे की आपण दर्शन घेण्यासाठी आले आहोत याकरिता या टाळ्या वाजवून त्यांना माहिती करून देत असतो. असं गुरुजींनी सांगितला आहे.
हे झालं आध्यात्मिक कारण पण यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे, त्यासाठी तीन टाळ्या वाजवल्यामुळे आपलं रक्ताभिसरण देखील यामुळे चांगलं होतं. त्यासोबतच भगवान शंकरांचे दर्शन घेताना आपण आपल्या हाताची लिंग मुद्रा देखील करावी. हे केल्यामुळे देखील महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात असं सांगितलं आहे. तसेच तुम्ही दर्शन घेताना शंख मुद्रा देखील करून दर्शन घ्यावं. असे गुरुजींनी सांगितलेले आहे. तर यामुळे मंदिरात गेल्यानंतर या तीन टाळ्या वाजवतात आणि ह्या जर तुम्ही मुद्रा केल्या तर तुमच्यावरती भगवान शंकराची ग्रुप आहे राहील असं गुरुजींनी सांगितलेले आहे.