अयोध्या, 11 डिसेंबर : हिंदू धर्मात सोमवारपासून रविवारपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक वाराला आणि वर्षातल्या प्रत्येक महिन्याला विशिष्ट महत्त्व असतं. त्याचप्रमाणे दर महिन्यात येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमेलादेखील ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे.
उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, अमावस्या तिथीला गंगेसह पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्यांमध्ये स्नान करून ध्यान केल्यानंतर भगवान विष्णूची विधीवत पूजा केली जाते. यामुळे आपले सर्व पाप नष्ट होतात, अशी मान्यता आहे. दरम्यान, येत्या 12 तारखेला कार्तिक अमावस्या आहे. त्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होईल.
advertisement
12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी सुरू होणारी अमावस्या 13 डिसेंबरला पहाटे 5 वाजून 1 मिनिटाने समाप्त होईल. या अमावस्येला राशींनुसार मंत्रजप करणं फलदायी ठरेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणता मंत्रोच्चार करावा, पाहूया.
तुळशी माळ घालताना आणि जपताना काय काळजी घ्यावी? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती
मेष : आपण अमावस्येला भगवान विष्णूची विधीवत पूजा करावी. पूजेदरम्यान ऊँ श्री महीधराय नम: या मंत्राचा जप करावा.
वृषभ : आपण अमावस्येला ऊँ श्री केश्वाय नम: या मंत्राचा जप करावा.
मिथुन : आपण अमावस्येला ऊँ श्री धनंजाय नम: या मंत्राचा जप करावा.
कर्क : आपण अमावस्येला भगवान विष्णूची विधीवत पूजा करावी. पूजेदरम्यान एका माळेसह ऊँ श्री श्रीरघुनाथाय नम: या मंत्राचा जप करावा.
सिंह : आपण अमावस्येला भगवान नारायणाची पूजा करावी. पूजेदरम्यान ऊँ श्री नरसिंहाय नम: या मंत्राचा जप करावा.
कन्या : आपण अमावस्येला ऊँ श्री श्रीहरये नम: या मंत्राचा जप करावा.
तूळ : आपण अमावस्येला ऊँ श्री विश्वकर्मणे नम: या मंत्राचा जप करावा.
वृश्चिक : आपण अमावस्येला ऊँ श्री कृष्णाय नम: या मंत्राचा जप करावा.
धनू : आपण अमावस्येला ऊँ श्री गोविन्दाय नम: या मंत्राचा जप करावा.
मकर : आपण अमावस्येला ऊँ श्री दामोदराय नम: या मंत्राचा जप करावा.
कुंभ : आपण अमावस्येला ऊँ श्री अच्युताय नम: या मंत्राचा जप करावा.
मीन : आपण अमावस्येला ऊँ श्रीजनार्दनाय नम: या मंत्राचा जप करावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
