तुळशी माळ घालताना आणि जपताना काय काळजी घ्यावी? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
तुळशी माळ घालणं किंवा जपणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मात्र असं असलं तरी तुळशी माळ घालणं किंवा जपणं याचे काही नियम सांगितले गेले आहेत.
पुणे, 11 डिसेंबर : तुळस या वनस्पतीला जसं आयुर्वेदात मानाचं स्थान आहे तसंच तुळशी माळेलाही अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे. अगदी वारकरी संप्रदायात तर तुळशी माळ घालणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थात विठ्ठल. ‘तुळशीमाळा गळा कर ठेवूनी कटी, ही त्या विठ्ठलाची ओळख. त्यामुळेच वारकरी संप्रदायात तुळशीमाळेला अनन्य साधारण महत्व आहे.
एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की तो वारकरी शाकाहाराचा अवलंब करत मुखी विठ्ठलाचं नाम स्मरण करत आपलं आयुष्य जगतो. त्यामुळे तुळशी माळ घालणं किंवा जपणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मात्र असं असलं तरी तुळशी माळ घालणं किंवा जपणं याचे काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन करून तुळशीची माळ धारण करून जप केल्याने सुख-समृद्धी वाढते तसेच धनप्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रात त्याचे कोणते नियम सांगितले आहेत याबद्दलच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
काय आहेत तुळशीची माळ घालण्याचे नियम
तुळशीची माळ घातल्याने शांती मिळते. यासोबतच आत्माही शुद्ध होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीत बुध आणि गुरूची स्थिती मजबूत होते, असं ज्योतिषी राजेश जोशी सांगतात.
कशी घालावी तुळशीची माळ
आधी छान आंघोळ करा. तुळशीच्या माळेलाही गंगाजलात धूवून घ्या. मग ही तुळशीची माळ गळ्यात घाला. तुळशीमाळ भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे ही माळ गळ्यात घातली की भगवान विष्णूचा आशिर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे. जी व्यक्ती तुळशीमाळ गळ्यात घालते त्या व्यक्तीने शुद्ध अन्न खावे. तुळशीमाळ घालणाऱ्याने मांसाहार आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. एकदा तुळशीमाळ गळ्यात घातल्यावर ती काढू नये, असं ज्योतिषी राजेश जोशी सांगतात.
advertisement
काय आहेत तुळशीमाळ जपण्याचे नियम
तुळशीची जपमाळ घालायची आणि जप करायची या दोन्ही वेगवेगळ्या असाव्यात. तुम्ही जी तुळशीची माळ जपत आहात ती परिधान करु नये. जपमाळ जप केल्यानंतर स्वच्छ कपड्याने झाकून ठेवा. तुळशीच्या माळेत 108 मणी असावेत.
तुळशीच्या माळेचे दोन प्रकार
तुळशीच्या माळा दोन प्रकारच्या असतात. श्यामा तुळशी आणि रामा तुळशी. मान्यतेनुसार, श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते. यासोबतच आर्थिक फायदाही होतो. दुसरीकडे, रामाला तुळशीची माळ घातल्याने आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढते असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते, अशी माहिती राजेश जोशी यांनी दिली आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 11, 2023 2:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुळशी माळ घालताना आणि जपताना काय काळजी घ्यावी? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती

