पाण्याच्या प्रवाहात तयार व्हायचं शिवलिंग, वाळूचा महादेव मंदिराची अनोखी आख्यायिका Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सगळ्यात सुरुवातीला महादेवाची ही मूर्ती पाण्याच्या वाहणाऱ्या झऱ्यामध्ये होती.
जालना, 11 डिसेंबर: आपल्या देशात देवी देवतांची असंख्य मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचं काही ना काही वेगळेपण असतं. जालना शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेलं कणकणेश्वर महादेव मंदिर जालनाकरांच्या पसंतीस उतरत आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात छोटंसं पण तितकंच देखणं मंदिर भाविकांना आपल्याकडे खेचून घेत आहे. येथील महादेवाची मूर्ती वाळूपासून बनलेली असल्याने वाळूचा महादेव म्हणून देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध कणकणेश्वर मंदिर
जालना शहरातील हिरालाल शेंडीवाले हे पुजारी वयाच्या अवघ्या दहा वर्षापासून कणकणेश्वर महादेव मंदिरात आराधना करतात. ते जालना शहरात ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. पण कणकणेश्वर महादेवावर त्यांची लहानपणापासूनच निस्सीम श्रद्धा आहे. तेच या मंदिराची देखरेख करतात. श्रावण महिन्यामध्ये इथे भाविकांची गर्दी असते. दर सोमवारी इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. सध्या इथे गर्दी कमी असली तरी सकाळी तीन वाजल्यापासून दर्शनासाठी लोक येण्यास सुरुवात होते.
advertisement
काय आहे आख्यायिका?
सगळ्यात सुरुवातीला महादेवाची ही मूर्ती पाण्याच्या वाहणाऱ्या झऱ्यामध्ये होती. तयार असलेली मूर्ती पाण्यामुळे वाहून गेली की नवीन मूर्ती आपोआप तयार व्हायची. कित्येक वर्ष मी इथे झोपलो. राहिलो. वाळूपासून नेहमी मूर्ती तयार होत असल्याने याला वाळूचा महादेव असं म्हटलं जातं. आजही या महादेवाची मूर्ती ही वाळूपासून तयार करण्यात आलेली आहे. तर दुसरी मूर्ती ही स्थापन करण्यात आलेली आहे, असं शेंडीवाले सांगतात.
advertisement
भाविकांची गर्दी
कणकणेश्वर महादेव मंदिरात महादेवाची स्वयंभू मूर्ती आहे. इथं जे मागेल ते प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे जालना शहरातील हजार ते दीड हजार लोक दररोज या ठिकाणी दर्शन घेतात. निसर्गाच्या सानिध्यात मंदिर असल्याने अनेक लोक फिरण्यासाठी इकडे येतात आणि महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत, असंही शेंडीवाले सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 11, 2023 10:20 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
पाण्याच्या प्रवाहात तयार व्हायचं शिवलिंग, वाळूचा महादेव मंदिराची अनोखी आख्यायिका Video







