सागवानी लाकडापासून बनलेल्या देवघराची करायचीय खरेदी? ‘इथं’ 1 हजारांपासून आकर्षक पर्याय उपलब्ध
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आपल्या घरामध्ये सुंदर असे देवघर असावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. लाकडापासून बनवण्यात आलेल्या देवघराची वेगवेगळे आकर्षक पर्याय इथे उपलब्ध आहेत.
आपल्या घरामध्ये सुंदर असे देवघर असावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे अश्या प्रकारचे देवघर कुठे मिळेल याचा शोध घेतला जातो. जालना शहरातील लक्कड कोट भागामध्ये लाकडापासून बनवण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू मिळतात. लाकडापासून बनवण्यात आलेल्या देवघराची वेगवेगळे आकर्षक पर्याय इथे उपलब्ध आहेत.
advertisement
advertisement
advertisement
देवघर खरेदी करण्यासाठी लोकांची जास्त मागणी ही मध्यम आकाराच्या देवघरांसाठी आहे. 21 बाय 17 21 बॉय 21 या प्रकारचे देवघरे सर्वाधिक विकली जातात. याचे कारण म्हणजे ते दिसण्यासाठी देखील आकर्षक असतात आणि लोकांना घेण्यासाठी देखील परवडणे योग्य असतात. 1 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतचे देवघर आमच्याकडे उपलब्ध आहेत, असं अर्जुन ढोलके सांगतात.
advertisement
advertisement