तिथी आणि मुहूर्त - माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 12.09 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 12.22 वाजेपर्यंत असेल. माघ महिन्यातील या 'द्विजप्रिय' संकष्टी चतुर्थीसाठी पूजेचे मुहूर्त जाणून घेऊ. सकाळचा मुहूर्त: 7.07 ते 8.29 पर्यंत. संध्याकाळचा मुहूर्त: 4.41 ते रात्री 9.19 पर्यंत.
advertisement
चंद्रोदय वेळ - संकष्टी चतुर्थीला चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व असते आणि त्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही. या दिवशी चंद्रोदय रात्री 9.42 मिनिटांनी होईल. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात शेंदलोण (सेंधा नमक) वापरू नये. उपवासाच्या अन्नामध्ये धान्याचा समावेश अजिबात नसावा. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये तसेच थोर-मोठांचा आणि महिलांचा अपमान करू नये.
व्यापारात प्रगतीसाठी उपाय - संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 7 अखंड कौड्या आणि 1 मूठभर अख्खी हिरवी मूग डाळ घ्या. हे सर्व एका हिरव्या कपड्यात बांधून कोणत्याही मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवा. लक्षात ठेवा की हा प्रयोग गुप्तपणे करायचा आहे, त्यामुळे याबद्दल कोणालाही सांगू नका आणि हे करताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्या. बुध ग्रहाची शांती आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काही खास उपाय या दिवशी करता येतील. या दिवशी गाईंना हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे जन्मकुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती सुधारते आणि आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते.
माघी संकष्टी चतुर्थीच्या पूजेसाठी आणि गणपतीची कृपा मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही श्रद्धेने म्हणू शकता.
अडचणी दूर करण्यासाठी (कार्यसिद्धी मंत्र): "ॐ गं गणपतये नमः।" हा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा संकटात हा मंत्र जपल्याने यश मिळते.
बुद्धी आणि विद्या प्राप्तीसाठी: "ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्।" हा गणेश गायत्री मंत्र आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती हवी आहे किंवा ज्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची आहे, त्यांच्यासाठी हा मंत्र अत्यंत लाभदायक आहे.
सर्व संकटांच्या नाशासाठी (संकटनाशन स्तोत्रातील मंत्र): "प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।" शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'संकटनाशन गणेश स्तोत्र' वाचावे. यामुळे जीवनातील मोठी संकटे दूर होतात.
आर्थिक लाभासाठी: "ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौम गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।" या मंत्राचा जप केल्याने आर्थिक चणचण दूर होते आणि घरामध्ये समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
पूर्वमुखी घर का सर्वात शुभ? पण 'वास्तु'चे हे नियम 90% लोक दुर्लक्षित करून चुकतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
