एके दिवशी कर्ण स्नान करून सूर्यदेवाची आराधना करत होता. पूजा आटोपताच इंद्रदेव ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्यांनी कर्णाकडून कवचकुंडल मागितलं. असं म्हणतात की त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परतलं नाही, परिस्थिती कशीही असो. त्याच्याकडून ज्याने काही मागितलं ते त्याला मिळालं.
Mahabharat : महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रच का निवडलं? या जागेत खास काय?
advertisement
महाभारताच्या युद्धापूर्वी इंद्रदेवांना भीती वाटत होती की जर आपला मुलगा अर्जुन कर्णाशी लढला तर कर्ण त्याच्यावर विजय मिळवेल. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडून त्याचं कवचकुंडल दान म्हणून मागून घेतलं होते. कर्णानेही दानाला नकार दिला नाही. कोणताही विचार न करता कर्णाने आपले कवचकुंडल भगवान इंद्राला दान केले. जर इंद्रदेवाने कर्णाची फसवणूक करून त्याच्याकडून कवचकुंडल घेतलं नसतं तर महाभारत युद्धात कर्णाचा पराभव करणं आणखी कठीण झालं असतं.
लोक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान इंद्राला कर्णाचे कवचकुंडल मिळाले, तेव्हा त्यांनी ते स्वर्गात नेले नाही. तर मग ते कुठे आहेत?
गुहेत आहेत कवचकुंडल?
असं म्हणतात एका गुहेत हे कवच कुंडल आहेत. त्या गुहेतून एक प्रकाश बाहेर पडतो. या गुहेत जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. आता त्या गुहेत प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे त्या गुहेत सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही. पण त्या गुहेतून प्रकाश बाहेर पडतो. त्यामुळे इथं ते कवचकुंडल असावेत असं म्हणतात.
Mahabharat : आईच्या गर्भातच चक्रव्यूहचं ज्ञान, तरी त्यात कसा अडकला अभिमन्यू?
असं मानलं जातं की जेव्हा इंद्रदेव कर्णाचे कवचकुंडल घेऊन जात होते तेव्हा सूर्यदेव त्याच्यावर खूप रागावले आणि त्यांनी त्याला शाप दिला. शापामुळे इंद्राच्या रथाचं चाक याच ठिकाणी अडकलं. त्यानंतर त्या ठिकाणी एक गुहा तयार करण्यात आली आणि कर्णाचे कवचकुंडल इथं लपवून ठेवण्यात आले. ते कवचकुंडल इतके शक्तिशाली होते की इंद्रालाही ते आपल्यासोबत स्वर्गात नेणं शक्य नव्हतं. छत्तीसगडमधील विजापूर येथील या गुहेत कर्णाचे कवचकुंडल आजही ठेवलेले असल्याचं मानलं जाते. त्या गुहेजवळ इंद्राच्या रथाच्या चाकांच्या खुणा असल्याचं स्थानिक सांगतात.
समुद्राजवळ आहेत कवचकुंडल?
दुसऱ्या मान्यतेनुसार पुरीच्या कोणार्कमध्ये कर्णाचे कवचकुंडल ठेवलेले आहेत. असं म्हणतात की इंद्रदेवांनी ते कपटाने मिळवले होते, त्यामुळे ते स्वर्गात नेऊ शकले नाहीत. मग त्यांनी ते समुद्रकिनाऱ्यावर लपवले. चंद्रदेवाने त्यांना हे करताना पाहिलं होतं. चंद्रदेव कर्णाचे कवचकुंडल घेऊन जाऊ लागले तेव्हा समुद्रदेवाने त्यांना थांबवलं. लोकमान्यतेनुसार सूर्यदेव आणि समुद्रदेव तेव्हापासून कवचकुंडलाचं रक्षण करत आहेत.