राधाकृष्णाच्या अधुऱ्या प्रेमकहाणीबाबत जाणून घेण्याआधी त्यांची पहिली भेट कशी झाली ते पाहुयात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, भगवान कृष्ण आणि राधा यांच्या भेटीशी संबंधित कथा स्वतःमध्ये विशेष आहे. असं म्हटलं जातं की एकदा नंदबाबा श्रीकृष्णासोबत बाजारात गेले होते. त्यावेळी त्यांना राधा दिसली. राधेचं सौंदर्य आणि अलौकिकता पाहून श्रीकृष्ण तिच्यावर मोहित झाले. राधेच्याबाबतीतही असंच घडलं. राधा आणि कृष्ण पहिल्यांदा ज्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणाला संकेत तीर्थ म्हणतात, जे कदाचित नांदगाव आणि बरसानादरम्यान आहे.
advertisement
Mahabharat : स्त्री रूपात लग्न, अद्भुत आहे भगवान श्रीकृष्णाच्या लग्नाची कहाणी
राधा-कृष्ण भेटीबद्दल आणखी एक कथा आहे. भगवान श्रीकृष्ण चार-पाच वर्षांचे असतील. ते त्यांच्या वडिलांसोबत गायी चरायला शेतात जात असत. एके दिवशी अचानक मुसळधार पाऊस पडला आणि भगवान श्रीकृष्ण रडू लागले. कृष्णाच्या वडिलांना काळजी वाटली की या हवामानात गायींसोबत कृष्णाची काळजी कशी घ्यावी. त्यावेळी समोरून एक सुंदर मुलगी येताना दिसली. मग वडिलांनी त्या मुलीला कृष्णाची काळजी घेण्याची विनंती केली. यावर ती मुलगी कृष्णाची काळजी घेण्यास तयार झाली. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून राधा होती. त्यावेळी राधा कृष्णापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती.
राधा आणि कृष्णाच्या अपूर्ण प्रेमाची कारणं
आत्म्यासाठी प्रेम नाही : धार्मिक कथांनुसार, भगवान कृष्ण आणि राधा यांच्यात आध्यात्मिक प्रेम होतं. यामुळे दोघांचंही लग्न झाले नाही. श्रीकृष्ण हे देखील संदेश देऊ इच्छित होते की प्रेम आणि विवाह या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रेमाचा अर्थ लग्न नाही. त्यांचा असा विश्वास होता की राधा ही त्यांची आत्मा आहे, अशा परिस्थितीत कोणी त्यांच्या आत्म्याशी लग्न करतो का?
वेगळंच नातं : ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, भगवान कृष्ण आणि राधा यांचं लग्न न होण्याचं एक कारण म्हणजे योग्य सुसंगततेचा अभाव. असं मानलं जातं की राधाचं लग्न यशोदेचा भाऊ रायन गोपाशी झाल्यामुळे ती श्रीकृष्णाची मामी बनली.
राधा स्वतःला कृष्णाच्या लायक मानत नव्हती : पौराणिक कथांनुसार, राधा स्वतःला कृष्णाच्या लायक मानत नव्हती. म्हणूनच ती कृष्णावर प्रेम करत असूनही त्याच्याशी लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. हेच कारण आहे की दोघांनीही कधीही लग्न केलं नाही.
राधा-रुक्मिणी हे देवीचं रूप होतं : असं म्हटलं जातं की राधा राणी ही देवी लक्ष्मीचं रूप होती आणि रुक्मिणी देखील देवी लक्ष्मीचं रूप होती. म्हणून असं मानलं जातं की राधा आणि रुक्मिणी एकच होत्या. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा विवाह रुक्मिणीशी झाला.
राधेला शाप : पौराणिक कथेनुसार राधा-कृष्णाला वियोगाचा शाप दुसऱ्या कोणी नसून कृष्णाचा जवळचा मित्र सुदामा याने दिला होता. आख्यायिकेनुसार, भगवान कृष्ण आणि राधा गोकुळात एकत्र राहत असत. एकदा राधेच्या अनुपस्थितीत, भगवान कृष्ण विरजा नावाच्या गोपिकासोबत फिरू लागले. हे पाहून राधा रागावली आणि त्या दोघांचाही अपमान करू लागली. रागाच्या भरात राधाने विरजाला पृथ्वीवर ब्राह्मण म्हणून दुःख भोगण्याचा शापही दिला. यावेळी सुदामाही तिथं होता. त्याने राधेला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिचा राह शांत होईना. त्यावेळी सुदामाने राधेला तुम्हाला तुमच्या प्रिय कृष्णापासून 100 वर्षे वेगळे राहावं लागेल, असा शाप दिला. असे मानले जाते की सुदामाच्या या शापामुळे राधा राणी आणि श्रीकृष्ण पृथ्वीवर जन्माला आले, पण त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.
असं मानलं जातं की कृष्ण आणि राधेचं लग्न झालं नसलं तरी ते कधीही वेगळे झाले नाहीत. त्यांच्यातील प्रेम कधीही शारीरिक नव्हतं. हेच कारण आहे की त्यांचं प्रेम आजही अमर आहे.
(सूचना : हा लेख इंटरनेटवरील सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जी फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा नाही.)