Mahabharat : आधी जिनं सांभाळलं तिलाच बायको बनवलं, नंतर मामाची मुलगी आणि तिसरी... कृष्णाच्या मुलाच्या विचित्र लग्नाची स्टोरी

Last Updated:

Mahabharat Story : मायावतीला त्या अनोख्या मुलाला पाहून खूप मोह झाला. मग नारद आले आणि त्यांनी मायावतीला प्रद्युम्नच्या जन्माचं रहस्य सांगितलं.

News18
News18
भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्नची कहाणी खूप विचित्र आहे. विशेषतः त्याच्या लग्नांची. कृष्णाच्या या पुत्राच्या तीन लग्नांबद्दल ज्याने ऐकलं तो थक्क झाला. विशेषतः जेव्हा त्याने पहिल्यांदा त्याच विवाहित स्त्रीशी लग्न केलं ज्याने त्याला लहानपणापासून वाढवलं होतं. इतकंच नाही तर लग्न करण्यासाठी त्याने त्या विवाहित महिलेच्या राक्षसी पतीचाही वध केला. त्याचे इतर दोन लग्न देखील काही वेगळे नव्हते.
प्रद्युम्न हा एक शक्तिशाली महारथी योद्धा होता. प्रद्युम्न हा कामदेवाचा अवतार मानला जातो. तो भगवान कृष्णाची पत्नी रुक्मिणीचा मुलगा होता. जेव्हा भगवान शंकरांनी कामदेवाला राख केलं तेव्हा त्याची पत्नी रती भगवान शिवाकडे गेली आणि रडू लागली. तेव्हा भगवान शिव यांना तिच्यावर दया आली. त्यांनी सांगितलं की कामदेव पुन्हा भगवान कृष्णाचा पुत्र म्हणून जन्म घेईल.
advertisement
रतीचा पुढचा जन्म राक्षसांच्या घरात झाला. तिचं नाव मायावती ठेवण्यात आलं. ती मोठी झाल्यावर तिचं लग्न शंबरासुर नावाच्या राक्षसाशी झालं. तो तिला खूप त्रास देत असे. तर  भागवत पुराण आणि कथासरित्सागरमध्ये असं लिहिलं आहे की शिवाच्या सल्ल्यानुसार रती शंबरसुर राक्षसाच्या स्वयंपाकघरातील मुख्य दासी मायावतीचं रूप धारण करते. ती स्वयंपाक करण्यातकुशल आहे. ती शंबरसुरच्या घरी तिच्या पतीच्या परत येण्याची वाट पाहते. विष्णू पुराण आणि हरिवंशमध्ये, रतीच्या पुनर्जन्माला मायादेवी म्हटलं आहे. तिचं वर्णन शंबरसुर राक्षसाच्या दासीऐवजी त्याची पत्नी म्हणून केलं आहे.
advertisement
कृष्णाच्या पुत्राचे अपहरण करून समुद्रात फेकलं
जेव्हा रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्नचा जन्म झाला तेव्हा शंबरासुरने या नवजात बालकाचं अपहरण करून समुद्रात फेकून दिलं. कारण त्याला कळलं की तो कृष्णाच्या पहिल्या अपत्याच्या हातून मरेल. भागवत पुराणानुसार, प्रद्युम्नच्या जन्मानंतर 10 दिवसांतच राक्षस शंबरासुराने त्याचे अपहरण केलं. कृष्णाच्या पुत्राला समुद्रात फेकल्यानंतर तो बेफिकीर झाला. पण प्रकरण इथेच संपलं नाही.
advertisement
एका मोठ्या माशाने त्याला गिळंकृत केलं. मग जेव्हा मासे मच्छीमारांच्या हातात आले तेव्हा त्यांनी ते शंबरासुराकडे नेले. ते त्याच्या स्वयंपाकघरात शिजवण्यासाठी नेण्यात आले. तिथं स्वयंपाकात पारंगत असलेल्या मायावतीसमोर जेव्हा मासे कापले गेले तेव्हा त्यातून एक सुंदर जिवंत मूल बाहेर आलं. पण अनेक ठिकाणी असंही म्हटलं आहे की मायावती ही फक्त शंबरासुराच्या स्वयंपाकघराची प्रमुख होती, ती त्याच्या हाताखाली काम करत होती.
advertisement
मायावतीने त्या मुलाला वाढवलं
मायावतीला त्या अनोख्या मुलाला पाहून खूप मोह झाला. मग नारद आले आणि त्यांनी मायावतीला प्रद्युम्नच्या जन्माचं रहस्य सांगितलं. त्यांनी तिला सांगितलं की त्याला काळजीपूर्वक वाढवा. प्रद्युम्न मोठा झाल्यावर त्याला कळलं की मायावती त्याला वाढवते पण त्याच्याशी पत्नीसारखं वागते. ती त्याच्यावर प्रेयसीसारखे प्रेम करते.
आणि याचं कारण विचारले असता त्याला सत्य कळलं. नारदांनी त्याला हे रहस्य सांगितलं. प्रद्युम्न त्याच्या मागील जन्मात कामदेव होता आणि त्याच्यासोबत असलेली स्त्री त्याच्या मागील जन्मात त्याची पत्नी रती होती.
advertisement
मायावती म्हणजेच रतीने प्रद्युम्नला दुष्ट शंबरासुराला मारून तिला आपल्यासोबत घेऊन जाण्यास सांगितलं. अशाप्रकारे, प्रद्युम्नचा पहिला विवाह रतीशी झाला.
नंतर मामाच्या मुलीशी लग्न
यानंतर प्रद्युम्नने त्याचा मामा रुक्मीची मुलगी रुक्मावतीशीही लग्न केलं. असं म्हटलं जातं की राजकुमारी रुक्मावतीला त्याचं शौर्य, सौंदर्य आणि आकर्षण शब्दांपलीकडे गेलं. तिने तिच्या स्वयंवरात त्याच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला.
advertisement
प्रद्युम्नचं तिसरं लग्न
त्याचं तिसरं लग्नदेखील विचित्र होतं. प्रभावती ही एक असुर राजकुमारी होती जी प्रद्युम्नच्या प्रेमात पडली आणि दोघंही पळून गेले आणि लग्न केलं. विष्णु पुराणातील अध्याय 91-95 मध्ये म्हटले आहे की प्रद्युम्न आणि प्रभावतीचा राक्षस पिता वज्रनभ यांच्यात भयंकर युद्ध झालं. वज्रनभाच्या शौर्याला आणि पराक्रमाला देवही घाबरले. प्रद्युम्न आणि वज्रनभ यांच्यात घनघोर युद्ध झालं. ज्याला महायुद्ध म्हणतात त्यात प्रद्युम्नाने वज्रनभाचा वध केला. यानंतर प्रद्युम्न आणि प्रभावती यांचा विवाह झाला.
प्रद्युम्नचा मृत्यू कसा झाला?
महाभारताच्या युद्धात आणि द्वारकेच्या रक्षणात त्याने विशेष भूमिका बजावली. नंतर यादव कुळातील इतर सदस्यांसोबत दारूच्या नशेत झालेल्या भांडणात प्रद्युम्नचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : आधी जिनं सांभाळलं तिलाच बायको बनवलं, नंतर मामाची मुलगी आणि तिसरी... कृष्णाच्या मुलाच्या विचित्र लग्नाची स्टोरी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement