तामसिक जेवण आणि व्यसन - महाशिवरात्रीचा दिवस शरीर आणि मन शुद्ध करण्याशी जोडलेला आहे. अशा वेळी मांस, मासे, अंडी किंवा मद्यपान करणं परंपरेच्या विरोधात मानलं जातं. काही लोक उपवास असूनही संध्याकाळी चहासाेबत सिगरेट ओढतात किंवा थोडी नशा करतात, पण हा दिवस संयमाचा आहे.
काय खावं आणि काय टाळावं?
फळं, दूध, दही, साबुदाणा, राजगिरा किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. लसूण-कांदा टाळणं सुद्धा चांगलं मानलं जातं. सात्विक अन्नामुळे मन शांत राहतं आणि पूजेत लक्ष विचलित होत नाही.
advertisement
महाशिवरात्रीलाच 23 वर्षांपूर्वी टीम इंडियाने पाकिस्तानचा केला होता असा गेम, आता
उशिरापर्यंत झोपणं आणि आळस - ही रात्र खूप खास मानली जाते. असं म्हणतात की याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणूनच अनेक लोक रात्रभर भजन-कीर्तन किंवा शिवनामाचा जप करतात.
ब्रह्म मुहूर्ताचं महत्त्व - सकाळी लवकर उठून स्नान करणं आणि स्वच्छ कपडे घालून पूजा करणं शुभ असतं. दिवसभर आळस करणं किंवा जास्त वेळ झोपून राहणं या दिवसाच्या भावनेला साजेसं नाही. भक्तीचा अर्थ फक्त उपवास नाही, तर जागृत राहणं सुद्धा आहे.
राग आणि वादावादी टाळा - सणासुदीच्या दिवशी घरांत कामं वाढतात. कधी प्रसाद बनवण्यावरून वाद होतात, तर कधी मंदिरात जाण्याच्या तयारीवरून तणाव निर्माण होतो- अशा छोट्या गोष्टी वातावरण बिघडवू शकतात. महाशिवरात्री शांती आणि धैर्याचा संदेश देते. या दिवशी कोणाशी भांडण करणं, अपशब्द बोलणं किंवा मनात कटुता ठेवणं योग्य मानलं जात नाही. जर कोणाशी मतभेद झाले तरी प्रयत्न करा की दिवस संपण्यापूर्वी मन साफ होईल. हीच खरी पूजा आहे.
शिवलिंगावर चुकीच्या वस्तू अर्पण करणं - भक्तीमध्ये भाव सगळ्यात महत्त्वाचा असतो, पण परंपरेची माहिती असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अनेकदा लोक नकळत शिवलिंगावर हळद किंवा सिंदूर वाहतात, जे योग्य मानलं जात नाही.
महाशिवरात्रीचा उपवास कधीपासून-कधीपर्यंत? व्रताचे अचूक नियम-विधी, उपवासाची वेळ
काय वाहावं?
शिवलिंगावर शुद्ध पाणी, गंगाजल, दूध, दही, मध, बेलपत्र, धतरा, भांग आणि पांढरी फुलं अर्पण केली जातात. तुळस आणि केतकीचं फूल वाहणं टाळलं पाहिजे. बेलपत्र वाहताना ते तीन पानांचं आणि स्वच्छ असेल याची काळजी घ्या. सध्या सोशल मीडियावर लोक उपवास आणि पूजेचे फोटो शेअर करतात. यात काहीच वाईट नाही, पण उपवास हा दिखाव्यासाठी नसतो. जर तुम्ही उपवास धरला असेल, तर नियमांचं पालन पूर्ण मनाने करा. सतत काही ना काही खात राहणं, खोटं बोलणं किंवा इतरांना कमी लेखणं या गोष्टी उपवासाचा मूळ हेतू कमकुवत करतात. उपवासाचा उद्देश स्वतःवर ताबा मिळवणं हा आहे. दिवसभर महादेवाचं स्मरण करा आणि गरजूंना मदत करा.
