मकरसंक्रांतीला स्नान आणि पूजा केल्यानंतर दान केले जाते. या दिवशी दान केल्याने अनेक पटीने पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्यानं सूर्य, शनिसह 6 ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात, हे सर्व ग्रह शुभफळ देतात. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात.
1. तीळ दान
advertisement
मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नानानंतर तिळाचे दान करावे. शक्य असल्यास या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. जर काळे तीळ नसेल तर फक्त पांढरा तीळ दान करा. असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धन-धान्य वाढते आणि शनिदोषही दूर होतो. असे म्हटले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनिदेवांनी काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले.
2. गुळाचे दान
मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करावे. या एका दानाने तुमच्या कुंडलीतील सूर्य, गुरु आणि शनि या तीन ग्रहांचे दोष दूर होतात. गूळ गुरू ग्रहाशी संबंधित मानला जातो. कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठीही गुळाचे दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले लाडू दान केले जातात.
3. उबदार कपडे
मकर संक्रांतीच्या दिवशी पूजेनंतर गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करावेत. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील राहू ग्रहाशी संबंधित दोष दूर होतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरतेय? नववर्षात या राशींचा बोलबाला सुरू; सुवर्णयोग
4. काळे उडीद-हिरवे मूग-तांदळाची खिचडी दान करा
मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद, हिरवे मूग आणि तांदूळ यापासून बनवलेल्या खिचडीचे दान केल्यास शनि, गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष दूर होतात. काळ्या उडीदचा संबंध शनिशी आणि हिरवा मूग बुध ग्रहाशी संबंधित आहे. खिचडीमध्ये तुम्ही हळद वापरता, जी गुरु ग्रहाशी संबंधित आहे. या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य बलवान होते. कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.
5. तांदूळ दान
मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे, तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे. यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते. तांदूळ दान केल्याने चंद्र दोषही दूर होतो.
पतीचं जीवन पालटतं! या जन्मतारखांच्या मुली घरी पैसा-पद-प्रतिष्ठा घेऊन येतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)