Numerology: पतीचं जीवन पालटतं! या जन्मतारखांच्या मुली घरी पैसा-पद-प्रतिष्ठा घेऊन येतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: गुरू ग्रह हा तीन मूलांक असलेल्या लोकांचा स्वामी असतो. त्याच्या प्रभावामुळे या मूलांकाच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि सुख, सौभाग्य येते. या मुलांकाच्या मुलीही लग्नानंतर आपल्या पतींसाठी भाग्यवान ठरतात.
मुंबई : अंकशास्त्रानुसार, लोकांचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. जन्मतारखेवरून लोकांचे मूलांक काढले जाते. कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्म झाला असेल तर त्यांचा मूलांक तीन असतो. गुरू ग्रह हा तीन मूलांक असलेल्या लोकांचा स्वामी असतो. त्याच्या प्रभावामुळे या मूलांकाच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि सुख, सौभाग्य येते. या मुलांकाच्या मुलीही लग्नानंतर आपल्या पतींसाठी भाग्यवान ठरतात. तीन मूलांक असलेल्या मुली त्यांच्या पतीसाठी कशा लकी ठरतात, ते जाणून घेऊयात.
जन्मापासूनच नशीबवान -
3, 12, 21 आणि 30 रोजी जन्मलेल्या मुलींचा मूलांक तीन असतो. तीन मूलांक असलेल्या मुली जन्मपासूनच नशीबवान असतात. देवतांचे गुरु गुरूची विशेष कृपा त्यांच्यावर असते. गुरुच्या कृपेमुळे या मूलांकाच्या मुलींना जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.
पतीच्या भाग्यावर परिणाम -
तीन मूलांक असलेल्या मुलींच्या भाग्याचे परिणाम लग्नानंतर त्यांच्या पतीच्या जीवनावरही पडतात. तीन मूलांक असलेल्या मुलींचं लग्न ज्यांच्याशी होतं, लग्नानंतर त्या मुलांचंही नशीब उजळतं. लग्नानंतर त्यांना जीवनात खूप यश मिळतं.
advertisement
जीवनात प्रगती -
तीन मूलांक असलेल्या मुलींशी लग्न केल्यावर त्यांच्या पतीच्या आयुष्यात प्रगतीचे रस्ते मोकळे होतात. त्यांना त्यांच्या पुढील सगळ्या कामात यश मिळू लागतं आणि ते आयुष्यात खूप पुढे जातात, प्रगती करतात.
पद आणि प्रतिष्ठा -
तीन मूलांक असलेल्या मुलींशी लग्न केल्यावर पत्नीच्या नशिबामुळे पतीला पद आणि प्रतिष्ठा मिळते. त्यांना समाजात आणि व्यवसायात स्थान आणि प्रतिष्ठा मिळते. अशारितीने तीन मूलांक असलेल्या मुली लग्नानंतर त्यांच्या पतीसाठी नशीबवान ठरतात, व पतीचं नशीब उजळतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 10, 2025 9:45 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Numerology: पतीचं जीवन पालटतं! या जन्मतारखांच्या मुली घरी पैसा-पद-प्रतिष्ठा घेऊन येतात