advertisement

डब्यातली चपाती रबरासारखी कडक होतेय? ही छोटीशी ट्रिक वापरा, तासंतास मऊ राहिल तुमची पोळी

Last Updated:
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, हॉटेलमध्ये किंवा बाहेर मिळणाऱ्या चपात्या तासनतास इतक्या मऊ कशा राहतात? यामागे काही रॉकेट सायन्स नाही, तर एक साधं वैज्ञानिक कारण आहे.
1/9
सकाळची घाईघाईत केलेली कामं, मुलांची शाळा आणि ऑफिसचा डबा... या सगळ्या व्यापात आपण अत्यंत प्रेमानं चपात्या बनवतो. गरम गरम असताना ही चपाती खायला खूप छान लागते, पण दुपारी ऑफिसमध्ये डबा उघडला की तीच चपाती कडक होते तर कधी चामट होते. जी अनेकदा चघळत रहायला लागते. मग नाईलाजानं ती कोरडी चपाती आपल्याला गळ्याखाली उतरवावी लागते.

2/9
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, हॉटेलमध्ये किंवा बाहेर मिळणाऱ्या चपात्या तासनतास इतक्या मऊ कशा राहतात? यामागे काही रॉकेट सायन्स नाही, तर एक साधं वैज्ञानिक कारण आहे. जर आपण पीठ मळण्यापासून ते चपाती भाजण्यापर्यंतच्या पद्धतीत थोडे छोटे बदल केले, तर घरची चपातीही दिवसभर मऊ राहू शकते. चला तर मग जाणून घेऊया या खास टिप्स.

3/9
चपाती कडक का होते?'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका अहवालानुसार, चपाती जशी थंड होते, तशी त्यातील आर्द्रता (Moisture) हवेत उडून जाते. पिठातील स्टार्चचे रेणू थंड झाल्यावर एकमेकांच्या जवळ येतात, ज्यामुळे चपाती चामट किंवा कडक होते. पिठाचा गोळा जास्त मळणे, तवा नीट गरम नसणे किंवा चपाती जास्त वेळ गॅसवर ठेवल्यानेही ती कोरडी पडते.

4/9
पीठ मळण्याची योग्य पद्धतमऊ चपातीचं खरं गुपित हे पीठ मळण्यात दडलेलं आहे. पीठ मळताना पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकावं. 1 कप गव्हाच्या पिठात 1 छोटा चमचा तेल किंवा तूप घातल्यास ओलावा टिकून राहतो. पीठ मळल्यानंतर ते किमान 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पिठातील ग्लूटेन सक्रिय होतं आणि चपाती छान फुलते.

5/9
अनेकांची हीच मोठी चूक होते की ते कमी गरम तव्यावर चपाती टाकतात. चपाती टाकण्यापूर्वी तवा कडकडीत गरम असावा. त्यावर पाण्याचे थेंब टाकले तर त्याचा लगेच आवाज यायला हवा. चपाती तव्यावर टाकल्यानंतर फक्त 15 ते 20 सेकंदात ती पालटावी. चपातीला जास्त वेळ तव्यावर ठेवू नका; कमी वेळात जास्त आचेवर भाजल्यामुळे आतील ओलावा टिकून राहतो.

6/9
वाफ रोखणे आहे महत्त्वाचेचपाती भाजून झाल्यावर ती थेट ताटात किंवा पेपरवर ठेवू नका. गरम चपाती लगेच एका स्वच्छ सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे चपातीची वाफ आतल्या आत राहते आणि ती कडक होत नाही. जर तुम्ही डब्यात चपाती नेणार असाल, तर स्टीलच्या डब्यात आधी एक कोरडा सुती कपडा ठेवा आणि मगच त्यात चपात्या ठेवा.

7/9
दूध आणि पाणीपीठ मळताना अर्धे पाणी आणि अर्धे कोमट दूध वापरल्यास चपात्या अधिक मऊ होतात. दुधामुळे पिठाला एक प्रकारचा नैसर्गिक मऊपणा मिळतो. जर तुम्ही दोन कप पीठ वापरत असाल, तर त्यात एक मोठा चमचा दही किंवा चिमूटभर बेकिंग सोडा घातल्याने चपाती कापसासारखी मऊ होते. दोन चपात्यांच्या मध्ये थोडं तूप लावल्यास त्या एकमेकांना चिकटत नाहीत आणि ताजी राहतात.

8/9
स्वयंपाकघरातील हे छोटे बदल तुमच्या दुपारच्या जेवणाचा आनंद द्विगुणित करू शकतात. उद्यापासून या टिप्स नक्की वापरून पाहा आणि डब्यातही घरच्या सारख्या गरमागरम आणि मऊ चपात्यांचा आनंद घ्या.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement