दिवसरात्र AC चालू ठेवून बिल वाढतंय? या स्मार्ट टिप्स वापरा, दिवसभर वापरला तरी कमी येईल वीजबिल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एसीच्या गारव्यात झोपणे सुखद वाटत असले तरी, महिन्याच्या शेवटी जेव्हा हातामध्ये वीज बिल येते, तेव्हा मात्र अनेकांच्या कपाळावर घाम फुटतो.
advertisement
एसीच्या गारव्यात झोपणे सुखद वाटत असले तरी, महिन्याच्या शेवटी जेव्हा हातामध्ये वीज बिल येते, तेव्हा मात्र अनेकांच्या कपाळावर घाम फुटतो. कुलरच्या तुलनेत एसी जास्त वीज वापरतो हे तर नक्कीच, पण जर आपण काही स्मार्ट पद्धती वापरल्या, तर थंड हवेचा आनंद घेतानाच आपण पैशांचीही मोठी बचत करू शकतो.चला तर मग जाणून घेऊया, तुमचे वीज बिल कमी करण्याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय.
advertisement
16 किंवा 18 नाही, तर 24 डिग्रीवर ठेवा तापमानअनेकांना वाटते की एसी 16 किंवा 18 डिग्रीवर ठेवला तर लवकर थंडावा मिळेल. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. 'ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी' (BEE) च्या मते, मानवी शरीरासाठी 24 डिग्री सेल्सिअस हे सर्वात आदर्श (Optimal) तापमान आहे. अभ्यासानुसार, एसीच्या तापमानात तुम्ही प्रत्येक 1 डिग्रीने वाढ केल्यास तब्बल 6 टक्के विजेची बचत होते. त्यामुळे विनाकारण तापमान कमी करून बिल वाढवू नका.
advertisement
सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष करू नकाहिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आपण एसीचा वापर बंद करतो. त्यानंतर उन्हाळ्यात तो थेट सुरू करण्यापूर्वी त्याची सर्व्हिसिंग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एसी दीर्घकाळ बंद असतो, तेव्हा त्याच्या फिल्टरमध्ये धूळ आणि घाण साचते. अशा स्थितीत खोली थंड करण्यासाठी मशीनला जास्त जोर लावावा लागतो, पर्यायाने वीज जास्त वापरली जाते. वेळेवर सर्व्हिसिंग केल्यास एसीचे आयुष्यही वाढते आणि बिलही कमी येते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







